'माझ्याकडेही ती कला असती तर...'; नरेंद्र मोदी ज्यो बायडन यांना नेमकं काय म्हणाले?, पाहा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 12:21 PM2023-06-23T12:21:06+5:302023-06-23T12:21:58+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकन संसदेत भाषण केलं. दहशतवादाशी दोन्ही देशांनी संयुक्तपणे लढण्याची गरज आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. व्हाईट हाऊसच्या बाहेरही नरेंद्र मोदींनी जोरदार भाषण केलं.
नरेंद्र मोदी व्हाइट हाऊसमधील स्टेट डिनरला देखील हजेरी लावली होती. स्टेट व्हिजिट हा अमेरिकेतील सर्वात वरच्या श्रेणीतील दौरा मानला जातो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्या औपचारिक निमंत्रणानुसार हा दौरा संपन्न होत असतो. जो बायडन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून मोदी स्टेट व्हिजिट करणारे तिसरे नेते आहेत.
#WATCH via ANI Multimedia | 15 moments when PM Modi got a standing ovation during his address to joint session of US Congresshttps://t.co/QJ3HOZ2YMO
— ANI (@ANI) June 23, 2023
ज्यो बायडेन यांचे डिनरसाठी आभार मानले. ते म्हणाला की, तुम्ही तुमच्या घराचे दरवाजे माझ्यासाठी, खास पाहुण्यांसाठी उघडलेत. पाहुणचाराने प्रभावित होऊन बरेचदा लोक गाणं म्हणू लागतात हे मी पाहिलं आहे. जर माझ्याकडेही गाण्याची कला असती तर मीही गाणं म्हटलं असतं. जपानमधील क्वाड समिटमध्ये तुम्ही मला एक समस्या सांगितली होती. मला खात्री आहे की तुम्ही ती समस्या सोडवली असेल. येथे येऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी जागा असेल, असं नरेंद्र मोदींनी सांगितले.
दरम्यान, मोदींनी त्यांच्या २०१४च्या दौऱ्याचाही उल्लेख केला. "मिस्टर प्रेसिडेंट! २०१४मध्ये तुम्ही माझ्यासाठी मेजवानीचे आयोजन केलं होतं, तेव्हा योगायोगाने माझा नवरात्रीचा उपवास चालू होता. मला आठवतंय की, उपवासात मी काहीच खाणार नाही का? हे तुम्ही मला वारंवार विचारत होतात पण मला काहीही खाणं शक्य नव्हतं आणि त्यावेळी तुम्ही माझी खूप काळजी घेत होतात. त्यावेळेस तुम्हाला मला प्रेमाने काहीतरी खायला घालायचं होतं, आज ती इच्छा पूर्ण होत आहे असं वाटतं, असं देखील नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.