नरेंद्र मोदी नेटीझन्सच्या 'रडार'वर, सोशल मिडीयात पंतप्रधानांच्या त्या विधानाची खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 09:25 AM2019-05-13T09:25:06+5:302019-05-13T09:25:37+5:30
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधकांना सळो की पळो करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सोशल मिडीयात एका वक्तव्यावरुन चांगलेच ट्रोल होऊ लागलेत.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधकांना सळो की पळो करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सोशल मिडीयात एका वक्तव्यावरुन चांगलेच ट्रोल होऊ लागलेत. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एअर स्ट्राईकच्या दिवशी असणाऱ्या हवामानावर भाष्य केलं. त्या विधानावर नेटीझन्सकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याची सोशल मिडीयात खिल्ली उडवली जात आहे.
एका हिंदी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मुलाखतीत म्हणाले होते की, 'बालाकोट एअरस्ट्राईकच्या वेळी अचानक हवामान खराब झाले. त्यामुळे अशा स्थितीत भारतीय वैमानिक पाकिस्तान सीमेत दाखल होतील का यावर संशय होता. त्यातच वैज्ञानिकांनी सर्जिकल स्ट्राईकची तारिख बदलण्यास सांगितले. मात्र माझ्या डोक्यात दोन विषय होते, एक म्हणजे गुप्तता आणि दुसरी म्हणजे आपण काही फार मोठे वैज्ञानिक नाही. मात्र त्यानंतर मी म्हणालो की, एवढ्या मोठ्या प्रमाणात आभाळ आणि पाऊस असेल तर त्याचा आपल्याला लाभही होऊ शकतो. त्यामुळे आपण पाकिस्तानच्या रडारमध्ये दिसणार नाही. या आभाळाचा आपल्याला लाभ होईल, असं आपण सांगितले. त्यामुळे सगळेच द्विधा मनस्थितीत होते. अखेरीस मीच म्हणालो, आभाळ आलेले आहे, चला पुढे जाऊ या...', असं मोदींनी मुलाखतीत सांगितले.
मात्र पंतप्रधान मोदींनी केलेल्या या विधानामुळे सोशल मिडीयात धुमाकूळ माजला आहे. मोदी यांनी केलेल्या विधानावर सोशल मिडीयात विनोदाचा पाऊस भरला आहे.
हवामानशास्त्राचे प्रशिक्षण मोदींनी घेतले कुठे? आणि ढगाळ वातावरण होते कुठे, दिल्ली की बालाकोटमध्ये.?
— पुणेरी नजर..! (@OfficeOfPunekar) May 12, 2019
असो, एक दोन प्रश्न अनुत्तरीत आहे प्रज्ञाबाई असताना वैमानिकांचा जिव धोक्यातच का घातला.?
एका शापात आख्खा पाकिस्तान का नाही संपवला.?? pic.twitter.com/vDjOsgSdpC
मोदी है तो सबकुछ मुमकिन है
— Akash Hambir (@HambirAkash) May 12, 2019
आता उन्हाळा खूप वाढलाय शेठ ते सूर्याचं काय मॅटर आहे बघा कि राव
याला म्हणतात पंतप्रधान
— तेजस जाधव {मराठा} (@PradipTejas) May 13, 2019
ढगाळ वातावरणामुळे सर्जिकल स्ट्राईक नको म्हणणाऱ्या संरक्षण तज्ञांना मी सांगितले की ढगाळ वातावरणामुळे आपली विमाने रडारवर दिसणार नाहीत, आणि शत्रूला चुकवून परत येतील.
इति श्रीयुत मोदी
मोदींजींच्या या शोधामुळे जगभरातले नागरी वैमानिक चिंतेत आहेत!
आज एक्दम शाहीर दादा कोंडकें गाजलेलं गाणं आठवलं
— Mandar Pataskar (@Manndarr_vfx) May 12, 2019
कदाचित बालाकोट मध्ये दहशतवाद्यांनी गाणं पण म्हंटल असेल...
वर ढगाळ लागली कळ, आणि बॉम्ब धडा-धडा गळ...
अर्थात बोली भाषेत ढगाळ वातावरणाचा अजून एक अर्थ निघतो..#cloud#radar
'नाला गॅस' च्या तुफान यशानंतर जाता जाता शेठ चा नवीन शोध ,
— Chowkidar Sachin (@Chowkid40569779) May 12, 2019
'ढगाळ वातावरणात रडार वर विमाने दिसणार नाहीत हल्ला करा'..
हसू नका रे , खिदळल्यास पाकिस्तान समर्थक समजून आपणांस देशद्रोही का समजण्यात येऊ नये ? अशी नोटीस पाठवली जाईल .
- हुकुमावरून 🤣🤣 @BJP4Maharashtra@Dev_Fadnavis
आता भविष्यात ढगाळ वातावरण झाले की रडारची आठवण झाल्याशिवाय नेटकरी झोपणार नाही
— Anil Kadbhane (@AnilKadbhane) May 12, 2019