बिहारनं जगाला लोकशाहीचा पहिला धडा शिकवला; निवडणूक निकालानंतर पंतप्रधान मोदींनी केलं असं ट्विट

By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 11, 2020 09:28 AM2020-11-11T09:28:49+5:302020-11-11T09:36:50+5:30

बिहारमध्ये 20 वर्षांनंतर प्रथमच सर्वाधिक जागा मिळविण्यात यशस्वी ठरलेला भाजपा आता मोठ्या भावाची भूमिका निभावू शकतो. दोन दशकांत नितीशकुमार यांनी भाजपाच्याच बळावर बिहारमध्ये सत्ता मिळवली परंतु भाजपाला त्यांनी कधीही लहान भाऊ मानले नाही.

pm Narendra modi tweet on bihar election results says Bihar taught the world the first lesson of democracy | बिहारनं जगाला लोकशाहीचा पहिला धडा शिकवला; निवडणूक निकालानंतर पंतप्रधान मोदींनी केलं असं ट्विट

बिहारनं जगाला लोकशाहीचा पहिला धडा शिकवला; निवडणूक निकालानंतर पंतप्रधान मोदींनी केलं असं ट्विट

Next
ठळक मुद्देया निवडणुकीच्या निकालसंदर्भात पंतप्रधान मोदींनी एकामागून एक ट्विट केले आहे.बिहारमध्ये 20 वर्षांनंतर प्रथमच सर्वाधिक जागा मिळविण्यात यशस्वी ठरलेला भाजपा आता मोठ्या भावाची भूमिका निभावू शकतो. दोन दशकांत नितीशकुमार यांनी भाजपाच्याच बळावर बिहारमध्ये सत्ता मिळवली परंतु भाजपाला त्यांनी कधीही लहान भाऊ मानले नाही.


नवी दिल्ली -बिहार निवडणूक निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत भाष्य केले आहे. ''बिहारने जगाला लोकशाहीचा पहिला धडा शिकवला. लोकशाही कशा प्रकारे बळकट केली जाते, हे आज पुन्हा एकदा बिहारने जगाला दाखवून दिले. बिहारमधील गरीब, वंचित आणि महिलांनी विक्रमी मतदान करून, आज विकासासाठी आपला निर्णायक निर्णय दिला आहे.''

या निवडणुकीच्या निकालसंदर्भात पंतप्रधान मोदींनी एकामागून एक ट्विट केले आहे. यात ते म्हणाले, ''बिहारच्या प्रत्येक मतदाराने आज स्पष्टपणे सांगितले, की त्यांना काही आकांक्षा आहेत. त्यांची प्राथमिकता केवळ आणि केवळ विकासालाच आहे. बिहारमध्ये 15 वर्षांनंतरही NDA च्याच सुशासनाला उन्हा एकदा आशिर्वाद मिळाला आहे. यावरून बिहारची स्वप्न काय आहेत, हे समजते.''

महिला मतदारांसंदर्भात मोदी म्हणाले, ''बिहारमधील माता-भगिनींनी यावेळी विक्रमी मतदान करून स्पष्ट केले आहे, की आत्मनिर्भर बिहारमध्ये त्यांची भूमिकाही अत्यंत महत्वाची आहे. अम्हाला समाधान वाटते, की गेल्या काही वर्षांत बिहारमधील मातृशक्तीत नवा आत्मविश्वास जागृत करण्याची NDAला संधी मिळाली. हा आत्मविश्वास बिहारला पुढे नेण्यात नेहमीच शक्ती देत राहील."

मोदींचा करिष्मा संपला, नितीश कुमारांना भाजपच्या 'या' रणनीतीचा फटका बसला; भुजबळांचा मोठा दावा

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही भाजप कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे आणि पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत, त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, "भाजप कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो. दुसरीकडे त्यांनी कोरोना काळातही सेवेसाठी प्रयत्न केले आणि दुसरीकडे केंद्र व राज्य सरकारचे काम लोकांपर्यंत पोहोचवून प्रत्येक बूथवर पक्षाला बळकटी देण्याचे काम केले.'

20 वर्षांनी भाजपा मोठा भाऊ; बिहारमध्ये अनेक वर्षांनी मिळाले भरघोस यश
बिहारमध्ये 20 वर्षांनंतर प्रथमच सर्वाधिक जागा मिळविण्यात यशस्वी ठरलेला भाजपा आता मोठ्या भावाची भूमिका निभावू शकतो. दोन दशकांत नितीशकुमार यांनी भाजपाच्याच बळावर बिहारमध्ये सत्ता मिळवली परंतु भाजपाला त्यांनी कधीही लहान भाऊ मानले नाही. या पार्श्वभूमीवर गेल्या 20 वर्षांतील चित्र पाहणे उद्बोधक ठरेल. पृथ्वीवरुन अंतराळातील उपग्रह नियंत्रित करता येतात, तर मग मतदान यंत्र हॅक का होऊ शकत नाही, असा दावा करुन काँग्रेस नेते उदीत राज यांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणूक आयोगाने हा दावा खोडून काढला. ही यंत्रणा विश्वसनीय व सक्षम असल्याचे आयोगाने म्हटलं आहे.

Bihar Assembly Election Result : बिहारमध्ये वाजतोय फडणवीसांचा डंका! भाजपनं सांगितलं कसा झाला फायदा?

Web Title: pm Narendra modi tweet on bihar election results says Bihar taught the world the first lesson of democracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.