कोरोनामुळे पंतप्रधान मोदींचा बांगलादेश दौरा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 08:44 AM2020-03-09T08:44:49+5:302020-03-09T08:49:06+5:30

शेख मुजीब उर रहमान यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रम बांगलादेशकडून रद्द

Pm Narendra Modi Visit To Bangladesh Cancelled Due To Coronavirus kkg | कोरोनामुळे पंतप्रधान मोदींचा बांगलादेश दौरा रद्द

कोरोनामुळे पंतप्रधान मोदींचा बांगलादेश दौरा रद्द

Next
ठळक मुद्देपंतप्रधान मोदी १७ मार्चला बांगलादेशला जाणार होतेकोरोनामुळे बांगलादेशकडून कार्यक्रम रद्दमोदी प्रमुख वक्ते म्हणून म्हणून सोहळ्यात सहभागी होणार होते

नवी दिल्ली: चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे कित्येक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम रद्द झाले आहेत. कोरोनामुळे अनेक परिषदा रद्द करण्याची वेळ आली आहे. जगभरातल्या राष्ट्रप्रमुखांच्या दौऱ्यांवरही कोरोनाचा परिणाम पाहायला मिळत आहे. बांगलादेश सरकारनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेख मुजीब उर रहमान यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेला शताब्दी सोहळा रद्द केला आहे. मोदी या सोहळ्यात मुख्य वक्ते म्हणून सहभागी होणार होते. बांगलादेश सरकारनं सोहळा रद्द केल्यानं मोदींनी त्यांचा बांगलादेश दौरा रद्द केला आहे. 

पंतप्रधान मोदी १७ मार्चला बांगलादेशला जाणार होते. मात्र कोरोनामुळे त्यांना हा दौरा रद्द करावा लागला आहे. शेख मुजीब उर रहमान यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेला शताब्दी सोहळा रद्द करण्यात आल्याची माहिती सोहळ्याच्या आयोजन समितीचे अध्यक्ष कमाल अब्दुल चौधरी यांनी दिली. कालच बांगलादेशमधल्या तिघांच्या कोरोनाच्या चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले. हे तिघेही नुकतेच इटलीहून परतले होते. 

शेख मुजीब उर रहमान यांच्या जयंती निमित्त आयोजित शताब्दी सोहळ्याची नव्यानं आखणी करण्यात येईल, अशी माहिती चौधरींनी दिली. 'हा सोहळा वर्षभर चालेल. मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळायची आहे. आम्ही वर्षभर कार्यक्रम करू आणि जगभरातल्या दिग्गज व्यक्ती यात सहभागी होतील,' असं चौधरी म्हणाले. 

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना कोणत्याही सार्वजनिक सभेशिवाय शेख मुजीब उर रहमान यांच्या जयंती निमित्त आयोजित शताब्दी सोहळ्याचं उद्घाटन करणार आहेत. कोरोनाचा धोका लक्षात घेता या सोहळ्याचं स्वरुप अतिशय मर्यादित ठेवण्यात आलं आहे. शेख हसीना यांनीच मोदींना या सोहळ्याचं निमंत्रण दिलं होतं. रहमान बांगलादेशाचे संस्थापक असून त्यांना बांगलादेशचे राष्ट्रपिता संबोधलं जातं. 
 

Web Title: Pm Narendra Modi Visit To Bangladesh Cancelled Due To Coronavirus kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.