पाच राज्यांतील निकालानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 08:03 AM2018-12-16T08:03:24+5:302018-12-16T13:58:04+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (16 डिसेंबर) प्रयागराजच्या दौऱ्यावर असणार आहेत. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंतप्रधान मोदी प्रयागराजमध्ये पहिल्यांदाच जनसभेला संबोधित करणार आहेत.

pm narendra modi visit prayagraj and raebareli | पाच राज्यांतील निकालानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली 

पाच राज्यांतील निकालानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली 

Next
ठळक मुद्दे5 राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोदींची पहिलीच रॅली2019 संदर्भात मोठा संदेश देणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासकामांचे करणार लोकार्पण

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (16 डिसेंबर) प्रयागराजच्या दौऱ्यावर असणार आहेत. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंतप्रधान मोदी प्रयागराजमध्ये पहिल्यांदाच जनसभेला संबोधित करणार आहेत. रविवारी दुपारी 12.30 वाजता पंतप्रधानांचे हेलिकॉप्टर प्रयागराजमधील एका खासगी शाळेत लँड होणार आहे. प्रयागराजमध्ये दाखल झाल्यानंतर पंतप्रधान संगमला भेट देतील. येथे अक्षय वट आणि हनुमान मंदिराला भेट देऊन ते पूजाअर्चना करतील. यानंतर दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ते एका जनसभेला संबोधित करतील. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पंतप्रधान मोदींची ही पहिलीच जनसभा असणार आहे. 

प्रयागराजमध्ये होणाऱ्या जनसभेमध्ये पंतप्रधान मोदी लोकसभा 2019 निवडणुकीसंदर्भात मोठा संदेश देणार असल्याचं म्हटलं जात आहे.
येथे पंतप्रधान मोदी कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचं लोकार्पण करणार आहेत. 300 प्रकल्पांचे लोकार्पण होणार असून यामध्ये विमानतळ आणि 7 उड्डाणपुलांचा समावेश  आहे. 



 



 



 



 

Web Title: pm narendra modi visit prayagraj and raebareli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.