पंतप्रधान मोदी थोड्याच वेळात देशाला संबोधित करणार; मोठ्या घोषणा होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 08:23 AM2021-11-19T08:23:15+5:302021-11-19T08:38:26+5:30
सकाळी ९ वाजता मोदी देशवासीयांशी संवाद साधणार; मोठ्या घोषणा होण्याची शक्यता
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात देशाला संबोधित करणार आहेत. सकाळी ९ वाजता ते देशाशी संवाद साधतील. मोदी नेमकं काय बोलणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. आज पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहेत. त्याआधी ते देशवासीयांशी संवाद साधतील.
आज गुरु नानक जी का प्रकाश पर्व है।
— PMO India (@PMOIndia) November 19, 2021
आज पीएम @narendramodi सिंचाई परियोजनाओं का लोकार्पण करने यूपी के महोबा जाएंगे।
फिर शाम को वो झांसी में राष्ट्र रक्षा समर्पण पर्व में सम्मिलित होंगे।
जाने से पहले वो सुबह 9 बजे राष्ट्र के नाम संदेश देंगे।
पंतप्रधान कार्यालयानं सकाळी ८ च्या सुमारास मोदींच्या आजच्या कार्यक्रमांची माहिती दिली. 'आज गुरुनानक जयंती आहे. आज पंतप्रधान सिंचन योजनांच्या लोकार्पणासाठी उत्तर प्रदेशमधल्या महोबा येथे जातील. त्यानंतर ते संध्याकाळी झांसीमध्ये राष्ट्र संरक्षण समर्पण पर्वात सहभागी होतील. त्याआधी ते सकाळी ९ वाजता देशाला संबोधित करतील,' असं पीएमओनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
पंतप्रधानांनी देशाला उद्देशून केलेल्या शेवटच्या भाषणात कोरोना महामारी आणि लसीकरणाचा विषय होता. याच विषयाला धरून पंतप्रधान मोदी आज बोलण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णांची संख्या घटल्यानं लसीकरणाकडे पाठ फिरवली जात असल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी घर घर दस्तक अभियान राबवण्यात येत आहे. त्याबद्दल मोदी आज बोलू शकतात.
आज गुरुनानक जयंती आहे. पंजाबमधील कोट्यवधी लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. गेल्या वर्षभरापासून तीन कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. त्यात पंजाबमधील शेतकऱ्यांचं प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे मोदी या अनुषंगानं काही बोलतील अशीही शक्यता आहे. विशेष म्हणजे मोदी आजपासून उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. तिथे ते जनसभेला संबोधित करणार आहेत. मात्र तरीही त्याआधी मोदी राष्ट्राला संबोधित करणार असल्यानं त्यांच्या आजच्या संबोधनाकडे देशाचं लक्ष लागलं आहे.