E-Shram Portal: एकच नंबर! पंतप्रधान नरेंद्र मोदी 38 कोटी लोकांना देणार मोठे गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 12:18 PM2021-08-26T12:18:52+5:302021-08-26T12:20:16+5:30
Check benefits of e-SHRAM portal, who will be covered and more: धक्कादायक बाब म्हणजे आजवर या असंघटीत कामगारांची कोणाकडेही कोणतीच माहिती उपलब्ध नव्हती. यामुळे कोरोना काळात पहिल्या लॉकडाऊनवेळी सर्वाधिक याची गरज भासली. केंद्रीय कामगार मंत्रालयाचे मंत्री भूपेंद्र यादव यांनी ई-श्रम पोर्टलचा लोगो लाँच केला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra modi) आज देशातील कोट्यवधी असंघटीत कामगारांना मोठे गिफ्ट देणार आहेत. मोदी सरकारने कामगारांच्या हितासाठी ई-श्रम पोर्टल (shram Portal) बनविले आहे. याचे आज लाँचिंग आहे. यानंतर कामगार वर्ग आपली नोंदणी या पोर्टलवर करू शकणार आहेत. (What is E-Shram Portal, How to Register on E-Shram Portal, know everything)
हा मजुरांचा डेटाबेस असणार आहे. याच्या मदतीने मोदी सरकारच्या योजनांचा फायदा या लोकांना पोहोचविला जाणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे आजवर या असंघटीत कामगारांची कोणाकडेही कोणतीच माहिती उपलब्ध नव्हती. यामुळे कोरोना काळात पहिल्या लॉकडाऊनवेळी सर्वाधिक याची गरज भासली. केंद्रीय कामगार मंत्रालयाचे मंत्री भूपेंद्र यादव यांनी ई-श्रम पोर्टलचा लोगो लाँच केला होता.
या पोर्टलद्वारे देशभरातील विविध क्षेत्रातील 38 कोटी मजुरांची माहिती गोळा केली जाणार आहे. यामध्ये मजूर, प्रवासी मजूर, घर कामगार, बांधकाम कामगार, प्लॅटफॉर्म, शेतीतील मजूर आदींसारख्या असंघटीत क्षेत्रातील कामगार रजिस्ट्रेशन करू शकणार आहेत.
काय करावे लागेल...
मजुर, कामगारांना आपले रजिस्ट्रेशन करावे लागेल. यामध्ये नाव, कामाचे क्षेत्र, पत्ता, कामाचा प्रकार, शिक्षण, कौशल्य आणि कौटुंबिक माहिती भरावी लागणार आहे. प्रवासी मजूर त्यांच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊ शकतात. ज्यांच्याकडे फोन नाही, लिहिता-वाचता येत नाही ते देखील या सीएससी केंद्रावर जाऊन नोंदणी करू शकणार आहेत. या नोंदणी झालेल्या कामगारांना युनिक अकाऊंट नंबर असलेले एक रजिस्ट्रेशन कार्ड देण्यात येणार आहे. या कार्डाचे नाव ई श्रम कार्ड असे ठेवण्यात आले आहे. ही माहिती त्यांच्या आधार क्रमांकाशी जोडली जाणार आहे.
टोल फ्री नंबर जारी... (Toll free number of E-Shram Portal)
य़ा करोडो कामगारांच्या सुविधेसाठी टोल फ्री नंबरही दिला जाणार आहे. ई-श्रम पोर्टलमरील रजिस्ट्रेशन वेळी कामगारांना आधार नंबर आणि बँक खाते नंबर द्यावा लागणार आहे. टोल फ्री नंबर 14434 हा असेल. (e-Shram portal: A database for unorganised sector workers)