PM Narendra Modi: करून दाखवलं! PM मोदी ठरले सर्वांत लोकप्रिय नेते; जगभरातील १३ दिग्गजांना धोबीपछाड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 01:30 PM2022-03-21T13:30:11+5:302022-03-21T13:31:43+5:30

PM नरेंद मोदींनी अथक निस्वार्थी सेवेच्या बळावरच जागतिक पातळीवर लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे, या शब्दांत कौतुक करण्यात येत आहे.

pm narendra modi world most popular leader highest 77 percent approval ratings among 13 global leaders as per morning consult | PM Narendra Modi: करून दाखवलं! PM मोदी ठरले सर्वांत लोकप्रिय नेते; जगभरातील १३ दिग्गजांना धोबीपछाड

PM Narendra Modi: करून दाखवलं! PM मोदी ठरले सर्वांत लोकप्रिय नेते; जगभरातील १३ दिग्गजांना धोबीपछाड

Next

नवी दिल्ली:पंतप्रधाननरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशातील पाच राज्यांपैकी चार राज्यांत मिळालेल्या यशानंतर पंतप्रधान मोदींच्या प्रसिद्धीत भरच पडलेली पाहायला मिळत आहे. यातच आता अमेरिकेतील ग्लोबर लीडर अप्रूव्हल ट्रॅकर मॉर्निंग कन्सल्टने (Morning Consult) जगभरातील नेत्यांचे अप्रूव्हल रेटिंग जाहीर केले आहेत. यामध्ये सर्वाधिक रेटिंग मिळवत पंतप्रधान मोदी जगातील सर्वांत लोकप्रिय नेते ठरले आहेत. जगभरातील अनेक दिग्गजांना धोबीपछाड देत पंतप्रधान मोदींनी ही कमाल कामगिरी करून दाखवल्याचे बोलले जात आहे. 

मॉर्निंग कन्सल्ट यांनी अलीकडेच यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी जगभरातील १३ नेत्यांना धोबीपछाड देत ७७ टक्के अप्रूव्हल रेटिंगसह आपला नंबर अव्वल ठेवला आहे. भारतातीलच नव्हे, तर जागतिक स्तरावर सर्वांत लोकप्रिय नेता म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक होत आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी ट्वीट करून दिली आहे. पंतप्रधान मोदी यांच्यानंतर दुसऱ्या स्थानी मेक्सिकोचे आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर आहेत. त्यांना ६३ टक्के अप्रूव्हल रेटिंग मिळाली आहेत. 

सर्वांत लोकप्रिय जागतिक नेते म्हणून मोदीची अव्वल

या यादीत तिसऱ्या स्थानी इटलीचे मारिया द्राघी असून, त्यांना ५४ टक्के, जपानच्या Fumio Kishida यांना ४५ टक्के अप्रूव्हल रेटिंग मिळाले आहे. विशेष म्हणजे या नेत्यांबद्दल निगेटिव्ह अप्रूव्हल रेटिंगही घेण्यात आले होते. त्यातही पंतप्रधान मोदींचे अप्रूव्हल रेटिंग सर्वांत कमी म्हणजे फक्त १७ टक्के आहे. जानेवारी २०२० ते मार्च २०२२ पर्यंत या काळात हे अप्रूव्हल रेटिंग घेण्यात आले. त्यात सर्वांत लोकप्रिय जागतिक नेते म्हणून पंतप्रधान मोदीच अव्वल ठरले आहेत.

पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता शिखरावर

गेल्या दोन वर्षांच्या रेटिंगमध्ये २ मे २०२० रोजी मोदी यांची लोकप्रियता शिखरावर होती. त्यांना या काळात ८४ टक्के अप्रूव्हल रेटिंग मिळाले होते. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांची लोकप्रियता घटलेली पाहायला मिळाली. कारण ०७ मे २०२१ रोजी त्यांचे अप्रूव्हल रेटिंग ६३ टक्क्यांपर्यंत खाली घसरले. जागतिक अन्य नेत्यांच्या तुलनेत पंतप्रधान मोदींचे अप्रूव्हल रेटिंग सर्वोच्च राहिले आहे. त्यात कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांना अनुक्रमे ४२ टक्के आणि ४१ टक्के अप्रूव्हल रेटिंग मिळाले. हे दोन्ही नेते अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या स्थानी राहिले. तर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे ३३ टक्के अप्रूव्हल रेटिंगसह सर्वात मागे आहेत.

दरम्यान, भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ट्विटमध्ये, पंतप्रधान नरेंद मोदी यांनी अथक निस्वार्थी सेवेच्या बळावरच जागतिक पातळीवर लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे, या शब्दांत त्यांचे कौतुक केले आहे. 
 

Web Title: pm narendra modi world most popular leader highest 77 percent approval ratings among 13 global leaders as per morning consult

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.