मोदींचे सल्लागार सिन्हा यांनी दिला राजीनामा, अधिकारीवर्गात फेरबदलांची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 09:59 AM2021-08-03T09:59:45+5:302021-08-03T10:00:18+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार अमरजित सिन्हा यांनी मुदतीआधीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विद्यमान कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांची पंतप्रधान कार्यालयात वर्णी लागण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार अमरजित सिन्हा यांनी मुदतीआधीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विद्यमान कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांची पंतप्रधान कार्यालयात वर्णी लागण्याची शक्यता आहे. गौबा कॅबिनेट सचिवपदावरून येत्या ३० ऑगस्ट निवृत्त होत आहेत. तसेच पंतप्रधान कार्यालयातील इतर अधिकारी वर्गातही मोठा फेरबदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पंतप्रधानांचे प्रधान सल्लागार पी.के. सिन्हा यांनीही काही महिन्यांपूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता अमरजित सिन्हा यांनीही तसाच निर्णय घेतला आहे.
भल्लांनाही मिळणार महत्त्वाचे पद?
ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस काही खात्यांचे सचिव निवृत्त होत आहेत. त्यात केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांचाही समावेश आहे. मात्र त्यांना या पदावर मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे दुसरे एखादे महत्त्वाचे पद त्यांना मिळू शकते.