...म्हणून 'दीदी' हिंसेवर उतरल्या तर; नरेंद्र मोदींचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 01:59 PM2019-02-02T13:59:34+5:302019-02-02T14:02:22+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमध्ये एका रॅलीचं आयोजन केलं आहे. या रॅलीला संबोधित करताना मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे.
कोलकाता- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमध्ये एका रॅलीचं आयोजन केलं आहे. या रॅलीला संबोधित करताना मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालच्या ठाकूरनगर रॅलीमध्ये ते म्हणाले, पश्चिम बंगालच्या जनतेचा एवढा पाठिंबा असल्याचं चित्र पाहिल्यामुळेच ममतादीदी हिंसेवर उतरल्या होत्या हे मला आता समजलं. आमच्याप्रति पश्चिम बंगालच्या जनतेत असलेल्या प्रेमाला घाबरून लोकशाहीच्या वाचवण्याचं नाटक करणारे निर्दोषांचा बळी घेण्याच्या मागे आहेत. स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांपर्यंत गावाकडच्या परिस्थितीकडे लक्ष देण्यात आलेलं नाही, हे देशाचं दुर्भाग्य आहे. पश्चिम बंगालमध्ये इतर राज्यांच्या तुलनेत गावांमधील समस्या बिकट असल्याचा उल्लेखही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे.
PM Narendra Modi in Thakurnagar: Ye drishya(crowd) dekhne ke baad ab mujhe samajh mein aa raha hai ki didi hinsa pe kyun utar aayi hain #WestBengalpic.twitter.com/82n9xDiUcH
— ANI (@ANI) February 2, 2019
बांगलादेशातून आलेल्या मटुआ समुदायातील जनतेला उद्देशून मोदी म्हणाले, भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशाचे तुकडे करण्यात आले. सांप्रदायिक दंग्यांमुळे लोकांवर अत्याचार झाले. बांगलादेश आणि पाकिस्तानातून लोकांना पळून आश्रयासाठी भारतात यावं लागलं. आम्ही नागरिकत्वाचा कायदा आणला आहे. संसदेत हा कायदा मंजूर होऊ द्यात, त्यामुळे जनतेला त्यांचा अधिकार मिळेल, असं आश्वासनही मोदींनी दिलं आहे. आपल्या देशात अनेकदा शेतकऱ्यांबरोबर कर्जमाफीचं राजकारण खेळलं जातं. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत होता, ते काही वर्षांनंतर पुन्हा कर्जबाजारी होत होते.
Prime Minister Narendra Modi addressing a public rally in Thakurnagar, West Bengal: This is just the beginning, the main budget after Lok Sabha election will have much more for the youth, farmers, and other sections of the society. pic.twitter.com/8LCKFNSe5F
— ANI (@ANI) February 2, 2019
आता राज्यांमध्ये कर्जमाफीच्या नावे मत मागण्यात आली. ज्यांनी कर्ज घेतलं आहे, त्यांचं कर्ज अद्याप माफ झालेलं नाही आणि ज्याचं झालंय त्यांना फक्त 13 रुपयेच मिळाले आहेत. मध्य प्रदेश आणि राजस्थानमधल्या या घटना आहेत.
Prime Minister Narendra Modi addressing a public rally in Thakurnagar, West Bengal: Jisne karz liya uski 2.5 lakh ki maafi ka vaada kiya tha aur maafi huyi kewal Rs 13 ki. Ye kahani Madhya Pradesh ki hai, vahin Rajasthan mein sarkar ne toh haath hi khade kar diye pic.twitter.com/ZWBOvwo9Da
— ANI (@ANI) February 2, 2019
आमचं सरकार शेतकऱ्यांचं जीवन आनंदी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. हा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे एक सुरुवात आहे. जेव्हा नवं सरकार बनवल्यानतंर पूर्ण अर्थसंकल्प येईल, तेव्हा शेतकरी आणि बेरोजगार तरुणांसाठी आम्ही काय उपाययोजना केल्यात याचं चित्र स्पष्ट होईल.
#WATCH West Bengal: Prime Minister Narendra Modi's chopper arrives in Thakurnagar. PM will be addressing a public meeting shortly pic.twitter.com/V1b0FRjwbR
— ANI (@ANI) February 2, 2019