मंत्रिमंडळ बैठकीनंतर आता पंतप्रधान मोदींचा भारत दौरा, ९ दिवसांची निवडणूक मॅरेथॉन; १२ राज्यांचा दौरा करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 12:46 PM2024-03-04T12:46:01+5:302024-03-04T12:47:06+5:30
लोकसभा निवडणूक काही दिवासतच जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दौरा सुरू केला आहे.
देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुका सुरू होणार आहेत. सर्व पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दौरा सुरू केला आहे, निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक प्रचाराला सुरुवाते केली आहे. पीएम मोदी आज सोमवारपासून दुसरी फेरी सुरू करणार आहेत. याअंतर्गत ते ९ दिवसांत ११ राज्यांचा दौरा करणार आहेत. १२ मार्चपर्यंत पंतप्रधान मोदी ९ राज्यांचा दौरा करणार आहेत. यादरम्यान ते जम्मू-काश्मीरलाही जाणार आहेत, तिथे ते दोन दिवस राहणार आहेत. या योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणा, तामिळनाडू, ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार, जम्मू-काश्मीर, आसाम, अरुणाचल प्रदेश, यूपी, गुजरात आणि राजस्थानचा दौरा करणार आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजही ईडीसमोर हजर होणार नाहीत, १२ मार्चनंतरची तारीख मागितली
पंतप्रधान नरेंद्र मोदी या राज्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत. यासह ते ११ मार्च रोजी दिल्ली येथील काही कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. आजपासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. पहिल्या दिवशी ते तेलंगणा, तमिळनाडू या राज्यात असणार आहेत. जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीनगरच्या बक्षी स्टेडियममध्ये मोठी सभा घेणार आहेत. या सर्व कार्यक्रमांमध्ये ६ मार्चला भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठकही होणार आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर दुसरी यादी जाहीर होऊ शकते.
पीएम मोदींचा नऊ दिवसांचा दौरा
पंतप्रधानांच्या ९ दिवसांच्या मॅरेथॉन दौऱ्याची सुरुवात तेलंगणातून होणार आहे. ते आधी आदिलाबाला पोहोचतील आणि नंतर चेन्नईला जातील. तिथून संध्याकाळी परतणार आणि तेलंगणाच्या राजभवनात मुक्काम करणार आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजे ५ मार्च रोजी पीएम मोदी तेलंगणातील संगारेड्डी येथे एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ओडिशातील जाजपूरला पोहोचतील. रात्रीच्या मुक्कामासाठी ते कोलकात्याला पोहोचू शकतात आणि राजभवनात मुक्काम करतील. येथून ते ६ मार्चला कार्यक्रमांना सुरुवात करतील आणि कृष्णानगरमध्ये सभेला संबोधित करतील. येथून ते बिहारमधील बेतिया येथे जातील आणि त्यानंतर संध्याकाळी दिल्लीला परततील. येथे ते केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत असतील.
पीएम मोदी दुसऱ्या दिवशी गुरुवारी श्रीनगरला पोहोचतील. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अरुणाचल, आसाम आणि पश्चिम बंगालच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत. ते अरुणाचल प्रदेशातील सेला बोगद्याचे उद्घाटन करतील आणि त्यानंतर आसाममध्ये रात्रीचा मुक्काम करतील. शनिवारी ते कोलकाता मेट्रोच्या एका विभागाचे उद्घाटन करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी १० मार्च रोजी उत्तर प्रदेशातील आझमगडलाही भेट देणार आहेत. ११ रोजी दिल्लीतील द्वारका एक्सप्रेस वेच्या उद्घाटनासह अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. १२ रोजी ते गुजरातमध्ये येणार आहेत.