PM नरेंद्र मोदींचा वाराणसीत रोड शो, रुग्णवाहिकेसाठी पंतप्रधानांनी थांबवला आपला ताफा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 04:51 PM2023-12-17T16:51:00+5:302023-12-17T16:51:46+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यात 19,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 37 प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत.
वाराणसी: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) रविवारी दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी वाराणसीत रोड शोदरम्यान एका रुग्णवाहिकेला जाण्यासाठी पीएम मोदींनी आपला ताफा थांबवला. या दौऱ्यात PM मोदी वाराणसी आणि पूर्वांचलसाठी 19,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 37 प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी ते नमो घाटावरुन काशी तमिळ संगम 2.0 चे उद्घाटनही करतील.
#WATCH | Prime Minister Narendra Modi stopped his convoy to give way to an ambulance during his roadshow in Varanasi.
— ANI (@ANI) December 17, 2023
On his 2-day visit to Varanasi, PM Modi will launch and inagurate 37 projects worth more than Rs 19,000 crore for Varanasi and Purvanchal. He will also launch… pic.twitter.com/NPZgLumo55
पीएम मोदींनी त्यांच्या रोड शो दरम्यान रुग्णवाहिकेला रस्ता देण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी ताफा थांबवून रुग्णवाहिका जाण्यासाठी मार्ग काढला होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच पीएम मोदी गुजरातच्या अहमदाबादमध्ये मेगा रोड शो करत होते, सुमारे 30 किमी लांबीचा रोड शो होता. या वेळी रुग्णवाहिकेला मार्ग देण्यासाठी त्यांनी आपला ताफा बाजूला केला होता.
#WATCH | Gujarat: Prime Minister Narendra Modi, en route from Ahmedabad to Gandhinagar, stopped his convoy to give way to an ambulance pic.twitter.com/yY16G0UYjJ
— ANI (@ANI) September 30, 2022
गेल्या वर्षी 30 सप्टेंबर रोजीही पंतप्रधान मोदींनी अहमदाबादहून गांधीनगरला जात असताना ताफ्यात अडकलेल्या रुग्णवाहिकेला मार्ग त्यांचा ताफा थांबवला होता. याशिवय, नोव्हेंबरमध्येही पंतप्रधान मोदी हिमाचलमधील चंबीच्या दौऱ्यावर होते आणि त्यांच्या ताफ्यात एक रुग्णवाहिका अडकली, तेव्हा त्यांनी ताफा थांबवला आणि रुग्णवाहिकेला मार्ग दिला.
वाराणसी दौऱ्यात काय करणार?
वाराणसी दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदी संध्याकाळी नमो घाटावरुन काशी तमिळ संगमच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान येथून कन्याकुमारी ते वाराणसी या काशी तामिळ संगम एक्सप्रेसलाही हिरवी झेंडी दाखवतील. आजपासून 31 डिसेंबरपर्यंत काशी तमिळ संगमच्या दुसऱ्या आवृत्तीत तामिळनाडू आणि पुद्दुचेरीतील सुमारे 1,400 लोक वाराणसी तसेच प्रयागराज आणि अयोध्येला जातील.