देश सुरक्षित हातामध्ये आहे - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 02:45 PM2019-02-26T14:45:21+5:302019-02-26T14:46:32+5:30

राजस्थानमधील चुरुमध्ये जाहीर सभेत उपस्थितांना संबोधित करताना नरेंद्र मोदींना भारतीय लष्कराच्या या धडाकेबाज कारवाईचे कौतुक केले. तसेच, देश सुरक्षित हातांमध्ये आहे. आज पुन्हा एकदा देशाला हा प्रधानसेवक नमन करत आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. 

PM Says "Country In Safe Hands" Hours After India Strikes Jaish Camp | देश सुरक्षित हातामध्ये आहे - नरेंद्र मोदी

देश सुरक्षित हातामध्ये आहे - नरेंद्र मोदी

Next

चुरु: पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या जवानांच्या शौर्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींना सलाम केला आहे.

राजस्थानमधील चुरुमध्ये जाहीर सभेत उपस्थितांना संबोधित करताना नरेंद्र मोदींनी भारतीय लष्कराच्या या धडाकेबाज कारवाईचे कौतुक केले. तसेच, देश सुरक्षित हातामध्ये आहे, असे ठामपणे सांगत पुन्हा एकदा देशाला हा प्रधानसेवक नमन करत आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. 


शेतकरी सन्मान योजनेसाठी राजस्थानच्या काँग्रेसच्या सरकारने शेतकऱ्यांची यादी पाठवली नाही, असा आरोप करत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा करण्यात आला आहे. आता शेतकरी बँकेत जाऊन पैसे काढू शकतात, असे नरेंद्र मोदी म्हणाले. 


याचबरोबर, नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये एका कवितेतून देशाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. तीच कविता आज आपल्या भाषणाची सुरुवात करताना पुन्हा सादर केली. 'देश नहीं मिटने दूंगा, देश नहीं रुकने दूंगा' अशी कविता  नरेंद्र मोदी यांनी यावेळी सादर करत केली. 


दरम्यान, दहशतवाद्यांच्या या कारवाईत भारतीय वायु सेनेच्या 'मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर 1000 किलोचे बॉम्ब फेकले. यात जवळापास 200 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दहशवाद्यांवर कारवाई करताना भारतीय वायुसेनेने पाकिस्तानला मोठा चकवा दिला आहे. पाकिस्तानला हल्ला करण्यात येणार आहे, याचा सुगावा लागू नये म्हणून भारतीय वायु सेनेने देशातील 20 विमानतळांवरून 'मिराज'च्या  विमानांचे उड्डाण केले. या मध्ये ग्वाल्हेर, भटिंडा, अंबाला या विमानतळांचा समावेश आहे. 

जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला घेण्याची, सर्जिकल स्ट्राइक-२ करण्याची तीव्र भावना देशभरातून व्यक्त होत होती. जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर बॉम्बवर्षाव करून भारताने आज पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारतीय लष्कराच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. 

नरेंद्र मोदींनी सादर केलेली कविता अशीः 
सौंगध मुझे इस मिट्टी की
मैं देश नही मिटने दूंगा
मै देश नही रुकने दूंगा
मै देश नही झुकने दूंगा

सौंगध मुझे इस मिट्टी की...

मेरा वचन है भारत मां को 
तेरा शीश झुकने नही दूंगा
सौंगध मुझे इस मिट्टी की
मै देश नहीं मिटने दूंगा

सौंगध मुझे इस मिट्टी की...

जाग रहा है देश मेरा
हर भारतवासी जितेगा
सौंगध मुझे इस मिट्टी
मै देश नहीं मिटने दूंगा

सौंगध मुझे इस मिट्टी की...

हमे फिर से दोहराना है 
और  खुद को याद दिलाना है
न भटकेंगे, न अटकेंगे
कुछ भी हो हम देश नहीं मिटने देंगे

सौंगध मुझे इस मिट्टी
मै देश नहीं मिटने दूंगा ।।
 

Web Title: PM Says "Country In Safe Hands" Hours After India Strikes Jaish Camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.