मोठी बातमी! लॉकडाऊनमुळे नोकरी गेलेल्यांना काम देणार, कुटुंबीयांनाही मिळणार 'या' ८ योजनांचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 09:32 AM2022-12-06T09:32:59+5:302022-12-06T09:34:18+5:30

कोरोना काळात मोठ्या प्रमाणात लोकांना नोकरी गमवावी लागली. बेरोजगारांमध्ये फेरीवाले, छोटे वेंडर आणि व्यावसायिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

pm svanidhi yojana 14 thousand unemployed vendor to get work two day training program by haryana government | मोठी बातमी! लॉकडाऊनमुळे नोकरी गेलेल्यांना काम देणार, कुटुंबीयांनाही मिळणार 'या' ८ योजनांचा लाभ

मोठी बातमी! लॉकडाऊनमुळे नोकरी गेलेल्यांना काम देणार, कुटुंबीयांनाही मिळणार 'या' ८ योजनांचा लाभ

Next

नवी दिल्ली-

कोरोना काळात मोठ्या प्रमाणात लोकांना नोकरी गमवावी लागली. बेरोजगारांमध्ये फेरीवाले, छोटे वेंडर आणि व्यावसायिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. आता या सर्वांच्या मदतीसाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेतला आहे. या सर्वांना स्वनिधी योजनेच्या माध्यमातून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत पुरवली जाणार आहे. तसंच रस्त्यावर विविध वस्तूंची विक्री करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या सुमारे १४,००० विक्रेत्यांना पंतप्रधान स्वानिधी योजनेचा लाभ देण्याची योजना सरकारने आखली आहे.

स्वानिधी योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या आठ योजनांचा लाभ या लहान विक्रेत्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. तसंच या लहान विक्रेत्यांना दोन दिवसांचं प्रशिक्षण देखील हरियाणा सरकारकडून दिलं जाणार आहे. या प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेणाऱ्यांना प्रतिदिन ३८८ रुपयांचा भत्ता देखील सरकार देणार आहे. 

लॉकडाऊनमुळे झालं मोठं नुकसान
पंतप्रधान स्वानिधी योजना जून २०२० मध्येच सुरू करण्यात आली होती. मार्च २०२० मध्ये कोरोना काळात लॉकडाउनमुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यावरील छोटे विक्रेते आणि फेरीवाल्यांना आपलं काम बंद करावं लागलं होतं. यादरम्यान मोठं आर्थिक नुकसान भोगावं लागलं होतं. बराच काळ या व्यावसायिकांच्या हाताला काहीच काम नव्हतं.

कोणत्याही हमीविना कर्ज
छोट्या विक्रेत्यांच्या मदतीसाठी केंद्रीय नागरी आवास विकास मंत्रालयानं १ जून २०२० साली पंतप्रधान स्वानिधी योजना सुरू केली. यात फेरीवाले-छोटे विक्रेत्यांना कोणत्याही हमीदाराशिवाय कर्ज उपलब्ध करुन देण्यात आलं. या योजनेच्या माध्यमातून १० हजार रुपयांपासून ५० हजार रुपयांपर्यंतचं कर्ज दिलं जातं. या कर्जाचं वैशिष्ट्य म्हणजे यात कोणत्याही हमीशिवाय सहज कर्ज उपलब्ध होतं. 

छोट्या विक्रेत्यांच्या कुटुंबीयांना जोडलं जाणार
छोट्या विक्रेत्यांच्या कुटुंबीयांनाही सरकारी योजनांचा लाभ घेता यावा यासाठी सरकारचा या व्यावसायिकांच्या कुटुंबीयांना आठ योजनांशी जोडण्याचा मानस आहे. जननी सुरक्षा योजना, वन नेशन वन कार्ड, पीएम जनधन योजना, पीएम जीवन ज्योती विमा योजना, पीएम सुरक्षा विमा योजना, पीएम श्रमयोगी मानधन योजना, पंजीकरण बीओसीडब्ल्यू आणि मातृवंदना योजनांचा यात समावेश आहे. 

इतक्या वेंडर्सची पटली ओळख
स्वानिधी योजनेसाठी आतापर्यंत १३,८४२ वेंडर्सची ओळख पटलेली आहे. तसंच या योजनेअंतर्गत आतापर्यंत बँकांकडून ४,२७७ वेंडर्सना १० हजारांचं कर्ज देखील दिलं गेलं आङे. तसंच वेंडर्ससाठीचं दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर ५ आणि ६ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलं आहे. यात म्युनिसिपल कॉर्पोरेशन अंतर्गत येणारे वेंडर्सही सहभाग घेऊ शकतात. या शिबिरात सहभाग घेणाऱ्या वेंडर्सना प्रतिदिन ३,८८ रुपयांप्रमाणे ७७६ रुपये खात्यात जमा केले जाणार आहेत.

Web Title: pm svanidhi yojana 14 thousand unemployed vendor to get work two day training program by haryana government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी