अरे व्वा! आता सर्वसामान्यही थेट पंतप्रधान कार्यालयाकडे करू शकतात तक्रार; जाणून घ्या नेमकं कसं?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 06:23 PM2021-08-26T18:23:01+5:302021-08-26T18:33:24+5:30
PMO Complaint : सर्वसामान्य नागरिकही आपल्या तक्रारी थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचवू शकतात. पंतप्रधान कार्यालयापर्यंत ऑनलाईन तक्रार करण्याची प्रक्रियाही अत्यंत सोपी आहे.
नवी दिल्ली - एखादं सरकारी काम करताना अनेकदा खूप उशीर होतो. सर्वसामान्य नागरिकांना अनेकदा सरकारी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. वेळ, पैसा खर्च करून देखील कामाच्या बाबतीत लोकांच्या पदरी निराशाच येते. केंद्र सरकारद्वारे अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहे. मात्र कधी कधी अशा योजनांचा लाभ मिळण्यास खूप उशीर होतो. पण आता काळजी करण्याची गरज नाही. कारण सर्वसामान्य नागरिकही आपल्या तक्रारी थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचवू शकतात. पंतप्रधान कार्यालयापर्यंत ऑनलाईन तक्रार करण्याची प्रक्रियाही अत्यंत सोपी आहे. अवघ्या काही मिनिटात तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. याबाबत जाणून घेऊया.
अवघ्या काही मिनिटांत करू शकता तक्रार; अतिशय सोपी आहे प्रक्रिया
- तक्रार नोंदवण्यासाठी सर्वप्रथम पंतप्रधान कार्यालयाची अधिकृत वेबसाईट https://www.pmindia.gov.in/en वर जा.
- येथे एक ड्रॉप डाऊन मेन्यू दिसेल तिथे Interact with PM मधील Write to the Prime Minister वर क्लिक करा.
- येथून तुम्ही पंतप्रधान कार्यालयाकडे कोणतीही तक्रार ऑनलाईन पाठवू शकता.
- आता तुमच्यासमोर एक CPGRAMS पेज ओपन होईल.
- या पेजवर तक्रारी दाखल करता येतात.
- तक्रार नोंदवल्यानंतर नोंदणी क्रमांक मिळेल.
- तुम्हाला तक्रारीशी संबंधित बातम्यांची कागदपत्र अपलोड करावी लागतील.
- विचारण्यात आलेली सर्व माहिती भरा.
- तुमची तक्रार नोंदवली जाईल.
ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवणं काही कारणामुळे शक्य नसेल तर तुम्ही ऑफलाईन पद्धतीनेही तक्रार दाखल करू शकता. यासाठी तुम्ही तुमची तक्रार पोस्टाने पंतप्रधान कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवू शकता. पंतप्रधान कार्यालय, साऊथ ब्लॉक, नवी दिल्ली - 110011. या पत्त्यावर पत्र पाठवता येईल. फॅक्सद्वारे तक्रारही नोंदवता येते. याकरता 011-23016857 या फॅक्स क्रमांकावर फॅक्स पाठवता येईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.