पीएमओने दिला कचरा उचलण्याचा आदेश, आता हेच काम करणार का लष्कर? नागरिकांचा संतप्त सवाल
By सागर सिरसाट | Published: September 22, 2017 06:28 PM2017-09-22T18:28:45+5:302017-09-22T20:48:46+5:30
पंतप्रधान कार्यालयाने संरक्षण मंत्रालयाला पर्यटकांकडून किंवा भाविकांकडून केला जाणारा पर्वतीय परिसरातील कच-याची योग्य विल्हेवाट लावण्यास सांगितलं आहे. भारतीय लष्कराने कचरा उचलण्याचं काम करावं यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई - पर्वतीय परिसरात पर्यटकांकडून किंवा भाविकांकडून केला जाणा-या कच-याची योग्य विल्हेवाट लावण्यास पंतप्रधान कार्यालयाने संरक्षण मंत्रालयाला सांगितलं आहे. या आदेशावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. भारतीय लष्कराने कचरा उचलण्याचं काम करावं यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. लष्कराचं काम हे देशाला सुरक्षित ठेवणं असतं देशातील कचरा साफ करणं नाही अशी टीका अनेकांनी केली आहे.
Stop crowing&get on with the job!Orders r from PMO&the nation is behind U! https://t.co/c5poJCCw0d
— Lt Gen H S Panag(R) (@rwac48) September 20, 2017
हा आदेश येताच सेवानिवृत्त लेफ्टिनेंट जनरल एचएस पनाग यांनी “काव-काव करणं बंद करा आणि कामावर चला ! आदेश पीएमओने दिला आहे आणि सर्व देश तुमच्या पाठिशी आहे'' असं खोचक ट्विट केलं. पनाग यांच्या ट्वीटवर अनेक जणांनी प्रश्न उपस्थित केले . त्यावर उत्तर देताना त्यांनी आणखी एका ट्विटमध्ये “आदेश आदेश असतो, पालन करावच लागतं, असं म्हटलं.
त्यावर, ज्या परिसरामध्ये लष्कराला साफ-सफाई करण्यास सांगितलं आहे तेथे साफसफाई कर्मचारी पोहोचू शकत नाही असं ट्विट करत एका युजरने पीएमओच्या आदेशाचा बचाव केला. पण 'ज्या ठिकाणी पर्यटक किंवा भाविक जाऊन कचरा करू शकतात तर ते स्वतःचा कचरा स्वतः साफ देखील करू शकतात. सैनिक स्वतः केलेला कचरा स्वतःच साफ करत असतात' असं उत्तर पनाग यांनी दिलं.
जम्मू-काश्मीरच्या कारगिल, लदाख, पूर्वोत्तर भारतातील सिक्कीम आणि उत्तराखंडच्या पर्वतीय भागांमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक जात असतात.
पीएमओच्या या आदेशाची माहिती संरक्षण मंत्री निर्मला सितारमण यांनी मीडियाला दिली. अनेक पर्वतीय परिसरांमध्ये सामान्य लोकांना पोहोचणं कठीण असतं, तरीही काही भाविक तेथे पोहोचण्यात यशस्वी होतात. त्या परिसरांतील परिस्थितीमुळे तेथे असलेला कचरा कधी साफ करता येत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी स्वच्छता ठेवणं हा देखील स्वच्छता अभियानाचा एक उद्देश आहे.
Hamari Sena kachara saph kare kya yahi aache din hai
— Amit Kumar Pandey (@AmitKum62004581) September 20, 2017
बस ही चूका देश का उद्धार क्योंकि सेना अभी तक अपने कचड़े को साफ़ कर 2 pareshan थी और अब सैलानियों क भी ठेके जय हो PM DM sharm ki baat hai.
— Ramesh singh (@rameshsingh1505) September 20, 2017
Will hurt pride of the armed forces. Someone should inform PM. Maybe he doesn't realise his mistake. bad for morale of armed forces
— jawahar (@jawaharshivkish) September 20, 2017
Why was this swach Bharat tax collected? Was it only for Modi's advertisement. This gov't have to be kicked out.
— anilkumar (@c_k_anil) September 20, 2017
Shame on senior officers for not showing spine and SAYING NO...MY MEN WILL NOT DO THIS. Shame on veterans to say orders are orders.
— Ranvir (@always_nation) September 20, 2017
I'm sure army will complete the given task. But, aren't there other civil govt agencia for the same task?!! Why not assign it to them?
— Arjun Subramanian P (@konnectarjun) September 21, 2017
Gen Are you serious? thik about your poor soilers? beware and let Gun be remains in right hands.....ashamed state of affairs....
— RAVINDRA KUMAR SINGH (@ravindrakrsng) September 20, 2017