PMO ने दिल्लीत दखल देणे बंद करावे - केजरीवाल

By admin | Published: September 26, 2015 10:27 AM2015-09-26T10:27:10+5:302015-09-26T10:29:15+5:30

केंद्र व दिल्ली सरकारमध्ये अद्याप वाद सुरू असतानाच 'पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) दिल्लीतील कारभारात दखल देणे बंद करावे' अशा शब्दांत अरविंद केजरीवाल यांनी सरकारला लक्ष्य केले.

PMO should stop interfering in Delhi - Kejriwal | PMO ने दिल्लीत दखल देणे बंद करावे - केजरीवाल

PMO ने दिल्लीत दखल देणे बंद करावे - केजरीवाल

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २६ - केंद्र व दिल्ली सरकारमध्ये अद्याप वाद सुरू असतानाच 'पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) दिल्लीतील कारभारात दखल देणे बंद करावे' अशा शब्दांत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरकारला लक्ष्य केले आहे. 
अरविंद केजरीवाल यांनी आज सकाळी ट्विटरवरून पंतप्रधान कार्यालयावर टीका करत सरकारवर हल्ला चढवला. ' काँग्रेस आणि भाजपा दोघांकडूनही नायब राज्यपाल नजीब जंग यांना हटवण्याची मागमी करण्यात येत आहे. जंग यांची काही चूक आहे का? तर तसेच काहीच नाहीये त्यांना पंत्परधान कार्यालयाकडून जे सांगण्यात येत आहे, तसेच ते करत आहेत. त्यांना हटवून प्रश्न सुटणार नाही.  त्यांच्या जागी दुसरी कोणीही व्यक्ती आली तरी पंतप्रधान कार्यालयाच्या हस्तक्षेपामुळे तीच परिस्थिती कायम राहील. त्यामुळे आता पंतप्रधान कार्यालयाने दिल्ली सरकारच्या कारबारात दखल देणे बंद करावे', असे ट्विट केजरीवाल यांनी केले आहे.
काँग्रेसने नजीब जंग यांना हटवण्याची मागणी केली आहे. नजीब जंग हे केंद्र सरकारचा एजंट असल्याप्रमाणे काम करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी केला आहे. 'त्यांना जितक्या लवकर हटवण्यात येईल, तितके चांगले होईल असेही ते म्हणाले.

Web Title: PMO should stop interfering in Delhi - Kejriwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.