पंतप्रधानांचे भाषण निराशाजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 04:28 AM2017-08-16T04:28:26+5:302017-08-16T04:28:29+5:30

स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेले भाषण ‘निराशाजनक’ असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसने दिली

PM's speech is disappointing | पंतप्रधानांचे भाषण निराशाजनक

पंतप्रधानांचे भाषण निराशाजनक

Next

नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेले भाषण ‘निराशाजनक’ असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे. या भाषणातून पंतप्रधानांनी देशातील तरुणांचा, शेतकºयांचा आणि समाजातील कमकुवत भागाचा विश्वासघात केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा मंगळवारी पत्रकार परिषदेत म्हणाले, मोदींना अद्याप गोरखपूर येथील घटनेचे गांभीर्य कळालेलेच नाही. इतर नैसर्गिक दुर्घटनांशी त्यांनी या प्रकरणाची तुलना केली आहे. अशा घटनांबाबत ते काळजीवाहू नसल्याचा आरोपही या वेळी शर्मा यांनी केला.
काश्मीर प्रश्नी पंतप्रधान मोदींनी केवळ दावे करण्याचे काम केले आहे. काश्मीर प्रश्नावर खोलवर जाऊन त्यांनी माहिती देणे अपेक्षित होते, असेही शर्मा म्हणाले. त्याचबरोबर मोदींनी आपल्या भाषणात सर्जिकल स्ट्राइकचाही उल्लेख केला. मात्र, हे सर्जिकल स्ट्राइक एक वर्षापूर्वी घडले आहे. त्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून या भागात अनेक हल्ले झाले, अजूनही येथे सतत गोळीबार होतो आहे. याबाबत मोदींनी आपल्या भाषणात बोलणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी असे न करता केवळ देशातील जनतेला राष्ट्र सुरक्षित हातात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही शर्मा यांनी केला.
आपल्या भाषणात भ्रष्टाचाराविरोधात लढण्याच्या मोदींनी केलेल्या उल्लेखाबाबत शर्मा म्हणाले, ३१ मार्चनंतर बंद करण्यात आलेल्या नोटा अद्यापही जप्त करण्यात येत आहेत. याबाबत रिझर्व्ह बँक गप्प का आहे?
>अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम
सरकारला वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करणे हे केवळ विरोधकांनी पाठिंबा दिल्याने शक्य झाले आहे. मात्र, याचा मोदींनी आपल्या भाषणात उल्लेख केला नाही. त्याचबरोबर भारताच्या स्वातंत्र्याला जबाबदार असलेले नेते पंडित जवाहरलाल नेहरू यांचाही उल्लेख त्यांनी केला नाही. देशाची अर्थव्यवस्था ‘जीएसटी’, ‘नोटाबंदी’साठी तयार नसतानाही या गोष्टी लादण्यात आल्याने अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे, असा आरोप शर्मा यांनी केला.
>‘समाजात तिरस्कार पसरवणाºया शक्तींविरोधात एकजुटीने लढायला हवे’
समाजात घृणा, तिरस्काराचा प्रचार, प्रसार करणाºया शक्तींविरोधात एकजुटीने लढा द्यायला हवा, असे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सांगितले. भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांनी सर्व देशवासीयांची प्रगती तसेच समृद्धी व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त केली.
सर्व भारतीयांनी एकत्र येऊन एकजुटीने दहशतवाद तसेच समाजात तिरस्कार पसरवणाºया देशविघातक शक्तींविरोधात लढायला हवे. तसेच भारतातील मूलभूत तत्त्वांचे जतन करायला हवे. सर्व भारतीयांना सुख, समृद्धी व सुदृढ आरोग्य लाभावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मुख्यालयात त्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी तसेच काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
>भाजपा खासदाराने फडकावला उलटा तिरंगा
सीतापूर : स्वातंत्र्य दिनी भाजपा खासदाराने उलटा झेंडा फडकावल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेशमधील धौरहरा येथील भाजपा खासदार रेखा वर्मा यांनी मंगळवारी ध्वजवंदन करताना उलटा झेंडा फडकावला. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोत त्या उलटा तिरंगा फडकावत फोटो काढून घेत असताना दिसत आहेत. हे फोटो सीतापूरमधील महोली येथी पिसावा ब्लॉकमधील आहेत. रेखा वर्मा यांच्याशी यासंबंधी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी बोलणे होऊ शकले नाही.
रेखा वर्मा यांनीही सीतापूरमधील महोली परिसरात तिरंगा यात्रेचे आयोजन केले होते. मात्र तिरंगा उलटा फडकावल्याने त्यांच्यावर टीका होऊ लागली.
>सरसंघचालक भागवतांना ध्वजारोहण करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न
नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत असताना केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना एका शाळेत ध्वजारोहण करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्थानिक जिल्हाधिकाºयांनी नियमांवर बोट दाखवून भागवत यांना अडवण्याचा प्रयत्न केला असला तरी भागवतांनी विरोध धुडकावून ध्वजारोहण केलेच. या घटनेमुळे केरळातील डाव्या सरकारचा आणि भाजपामधील संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे दिसून येते.

Web Title: PM's speech is disappointing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.