बापरे! ऑक्सिजन सिलिंडरसह बँकेत पोहोचला कर्मचारी, अधिकाऱ्यांवर केले गंभीर आरोप; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 10:36 PM2021-05-26T22:36:06+5:302021-05-26T22:40:07+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना देखील समोर येत आहेत.
नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा 2,71,57,795 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,08,921 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 4,157 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,11,388 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना देखील समोर येत आहेत. ऑक्सिजन सिलिंडरसह एक कर्मचारी थेट बँकेत पोहोचला असून अधिकाऱ्यांवर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
झारखंडमधील (Jharkhand) बोकारोमध्ये (Bokaro) पंजाब नॅशनल बँकेत (Punjab National Bank) ही घटना घडली आहे. पीएनबीच्या अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्याने छळ केल्याचा आरोप केला आहे. कोरोना संसर्गातून (corona virus) बरं झाल्यानंतरही कर्मचाऱ्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. ऑक्सिजन सिलिंडरची गरज भासत आहे. मात्र असं असतानाही कर्मचाऱ्याला जबरदस्तीने कामावर बोलावलं जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच वेतनाबाबतही त्याच्यासोबत गैरवर्तन केलं जात असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र या प्रकरणात अद्याप पीएनबी बँकेकडून कोणतंही अधिकृत वक्तव्य आलेलं नाही.
बोकारो Punjab National Bank कर्मचारी अरविंद कुमार कुछ दिन पहले कोरोना से संक्रमित हो गए थे। ठीक होने के बाद उनके लंग्स में इंफेक्शन हो जाने की वजह से उन्हें ऑक्सीजन सपोर्ट में घर में ही इलाज चल रहा है। ऑक्सीजन सपोर्ट में रहने के बाद भी बैंक में काम करने के लिए बुलाया जाता है। pic.twitter.com/cVMnxKe7rb
— Haribansh (@Hariban84424968) May 26, 2021
बोकारो सेक्टर 4 मधील पंजाब नॅशनल बँकेत ही घटना घडली आहे. येथे काम करणाऱ्या अरविंद कुमार हे काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यांनी सांगितलं की, 10 दिवसांपर्यंत त्यांना ताप होता, त्यानंतर ते ठीक झाले. मात्र त्यानंतरही त्यांच्या फुप्फुसात कोरोना संसर्गाचा परिणाम दिसत होता. 10 दिवसांनंतरही ते ऑक्सिजन सपोर्टवर होते. अरविंद यांनी आरोप केला आहे की, अशा परिस्थितीतही बँकेतून त्यांना सतत कामावर बोलावले जात आहे. शेवटी याला कंटाळून त्यांनी राजीनामा दिला, मात्र त्याचा राजीनामा मंजूर करण्यात आला नाही.
अंत्यसंस्कारासाठी गावातलं कोणीही पुढे आलं नाही... शेवटी मुलीनेच पीपीई किट घालून केलं सगळं पण त्यानंतर श्राद्धाला तब्बल 150 जण हजर #coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindiahttps://t.co/5qJ9Tt3wXh
— Lokmat (@MiLOKMAT) May 26, 2021
बोकारे सेक्टर 2 मध्ये राहणारे बँक कर्मचारी अरविंद कुमार यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. बँकेकडून वारंवार बोलावलं जात असल्याने ते ऑक्सिजन सपोर्ट सोबत घेऊन बँकेत पोहोचले. अरविंद यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीयही होते. अरविंद ऑक्सिजन सिलिंडरसह तोंडावर मास्क लावून बँकेत ते पोहोचले. बँकेत अरविंदला पाहून सर्वजण चकीत झाले. अरविंद यांनी बँकेत उपस्थित असलेल्या लोकांना आपल्याला होत असलेला त्रास सांगितलं. याचा घटनेचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus Live Updates : हृदयद्रावक! गरोदरपणातही 9 महिने रुग्णालयात केली कोरोना रुग्णांची सेवा पण...; मन सुन्न करणारी घटना #coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindiahttps://t.co/zD2iTbd4fu
— Lokmat (@MiLOKMAT) May 26, 2021
"मास्क लावला नाही म्हणून पोलीस आले आणि मुलाला घेऊन गेले...त्याच्या हातावर आणि पायावर खिळे ठोकले"#CoronavirusIndia#coronavirus#mask#Policehttps://t.co/OvlF4Ty4OQ
— Lokmat (@MiLOKMAT) May 26, 2021