PNB scam: नीरव मोदीविरोधात इंटरपोल नोटीस जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 12:27 PM2018-02-16T12:27:11+5:302018-02-16T12:32:59+5:30

नीरव मोदीची ५१०० कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

PNB Fraud Case INTERPOL diffusion Notice issued Nirav Modi his wife Ami Modi brother Nishal Modi and MehulChoksi | PNB scam: नीरव मोदीविरोधात इंटरपोल नोटीस जारी

PNB scam: नीरव मोदीविरोधात इंटरपोल नोटीस जारी

googlenewsNext

नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) महाघोटाळ्यातील आरोपी नीरव मोदीविरोधात भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून शुक्रवारी इंटरपोल डिफ्युजन नोटीस जारी करण्यात आली. नीरव मोदीसोबत त्याची पत्नी अमी मोदी, भाऊ निशाल मोदी आणि गीतांजलीचे प्रमोटर मेहुल चौकसी यांना पकडण्यासाठी इंटरपोललाही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नीरव मोदीभोवतीचा फास आणखी आवळला गेला आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, नीरव मोदी, पत्नी अमी मोदी, भाऊ निशाल मोदी आणि गीतांजलीचे प्रमोटर मेहुल चौकसी हे चौघेही जानेवारीच्या सुरुवातीलाच भारतातून पसार झाले होते. सध्या नीरव मोदी स्वित्झर्लंडमध्ये लपून बसल्याची चर्चा आहे. याआधी अंमलबजावणी संचलनालयाने मोदी आणि चौकसीला समन्स बजावले होते. सीबीआयनेही या दोघांचे पासपोर्ट रद्द करण्याची मागणी केली आहे. 

तत्पूर्वी सीबीआय व अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारपासून नीरव मोदीच्या देशभरातील मालमत्तांवर छापे टाकायला सुरूवात केली. यात ५१०० कोटी रुपयांची हिरे, ज्वेलरी, मौल्यवान खडे आणि सोन्याची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ईडीच्या एका अधिकाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर सांंगितले की, मोदी आणि अन्य आरोपींच्या मुंबईतील पाच संपत्ती सील करण्यात आल्या आहेत. याशिवाय बँक खात्यातील रक्कम आणि फिक्स डिपॉझिटची ३.९ कोटी रुपयांची रक्कमही जप्त करण्यात आली. पंजाब नॅशनल बँकेच्या तक्रारीवरून ही कारवाई केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई मुंबई, हैदराबाद, जयपूर, गुजरात आणि दिल्लीमध्ये किमान १७ जागांवर करण्यात आली. ईडीने ज्या जागांवर ही कारवाई केली त्यात मोदीचे मुंबई येथील कुर्ला भागातील घर, काळा घोडा भागातील ज्वेलरीचे दुकान, वांद्रा आणि लोअर परळ भागातील कंपनीची तीन ठिकाणे, गुजरातमधील सुरत येथील तीन ठिकाणे आणि दिल्लीच्या डिफेन्स कॉलनी व चाणक्यपुरी भागातील मोदीचे शोरूम यांचा समावेश आहे.

 









 

Web Title: PNB Fraud Case INTERPOL diffusion Notice issued Nirav Modi his wife Ami Modi brother Nishal Modi and MehulChoksi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.