PNB Recruitment 2021: पंजाब नॅशनल बँकेत नोकरीची संधी, परीक्षाही नाही; 12 वी पास करू शकणार अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 06:23 PM2021-02-21T18:23:40+5:302021-02-21T18:26:06+5:30
PNB Recruitment for peons Post: महत्वाचे म्हणजे यासाठी उच्चशिक्षण किंवा कोणत्याही विशेष शाखेतून शिक्षण घेतल्याची अट नसून परीक्षाही घेतली जाणार नाहीय. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील दुसऱ्या मोठ्या बँकेने म्हणजेच पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) यावेळी विशेष भरती आयोजित केली आहे.
बँकेमध्ये नोकरी करु इच्छिनाऱ्या तरुण बेरोजगारांसाठी किंवा नोकरी शोधत असलेल्यांसाठी चांगली संधी चालून आली आहे. महत्वाचे म्हणजे यासाठी उच्चशिक्षण किंवा कोणत्याही विशेष शाखेतून शिक्षण घेतल्याची अट नसून परीक्षाही घेतली जाणार नाहीय. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील दुसऱ्या मोठ्या बँकेने म्हणजेच पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) यावेळी विशेष भरती आयोजित केली आहे. यामुळे देशभरातून कुठूनही तुम्ही अर्ज करू शकणार आहात व तुमच्या भागात नोकरी करू शकणार आहात. (Punjab National Bank Recruitment 2021: Huge Opportunity For 12th Passed Students, Apply Soon)
पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) देशभरातील शाखांसाठी शिपायी पदासाठी 152 जागांवर भरती सुरु केली आहे. यासाठी बँकेने भरतीची जाहिरात काढून अर्ज मागविले आहेत. या भरतीसाठी फक्त 12 वी पास असण्याची आवश्यकता आहे. यासोबत हिंदी आणि इंग्रजीचे सामान्य ज्ञान असावे. अशा योग्य आणि इच्छुक उमेदवारांनी आपल्या आपल्या विभागानुसार ठरविलेल्या तारखेपर्यंत अर्ज करायचा आहे.
पीएनबीने अधिकृत वेबसाईटवर pnbindia.in वर भरतीची जाहिरात आणि माहिती प्रसिद्ध केली आहे. देशभरात भरती असल्याने तुम्हाला कोणतेही बंधन असणार नाही.
नोटीस : 11 फेब्रुवारी, 2021
चेन्नई सर्कल : 22 फेब्रुवारी, 2021
हिसार सर्कल : 26 फेब्रुवारी, 2021
बंगळुरू वेस्ट सर्कल : 27 फेब्रुवारी, 2021
सूरत सर्कल : 01 मार्च, 2021
बंगळुरू ईस्ट सर्कल : 01 मार्च, 2021
बालासोर सर्कल : 01 मार्च, 2021
रोहतक सर्कल : 03 मार्च, 2021
हरियाणा सर्कल : 04 मार्च, 2021
रिक्त पदे
हिसार सर्किल : 19
रोहतक सर्कल : 22
चेन्नई साउथ सर्कल : 20
बालासोर सर्कल : 19
बंगळुरू वेस्ट सर्कल : 18
बंगळुरू ईस्ट सर्कल : 25
सूरत सर्कल : 10
हरियाणा सर्कल : 19
वयाची अट
कमीतकमी वय 18 वर्षे ते जास्तीतजास्त वय 24 वर्षे असावे.
या जागांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यानुसार तुमच्या क्षेत्रातील बँकेमध्ये जाऊन अर्जासोबत स्व-हस्ताक्षरित फोटो, शैक्षणिक प्रमाणपत्र, योग्यता प्रमाण-पत्र आदी जमा करायचे आहे.
भरती नोटिफिकेशन जारी करण्यासाठी इथे क्लिक करा...
ऑफलाईन अर्जासाठी इथे क्लिक करा...
Railways Recruitment 2021: मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, भुसावळ, नागपूर आणि सोलापूरमध्ये जवळपास 2500 जागांवर भरती निघाली होती. याला आता दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) आणि वेस्ट सेंट्रल रेल्वे (West Central Railway) ने देखील हातभार लावला आहे. आता एकूण ट्रेड अप्रेंटिसच्या 3119 झाल्या आहेत. यासाठीची जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे. (Railways Recruitment 2021 for 3119 Apprentice Posts: Apply Online @rrccr.com, Download RRC Railway Notification Here)
नोकर भरतीच्या अन्य बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा...