PNB Scam : नीरव मोदीची 5 हजार 100 कोटींची संपत्ती ईडीनं केली जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 08:49 PM2018-02-15T20:49:58+5:302018-02-15T21:09:12+5:30
पंजाब नॅशनल बँकेतील महाघोटाळ्याचा म्होरक्या नीरव मोदीचं घर आणि गीतांजली शोरूमसह इतर 9 ठिकाणांवर ईडीनं आज छापे टाकले आहेत.
नवी दिल्ली- पंजाब नॅशनल बँकेतील महाघोटाळ्याचा म्होरक्या नीरव मोदीचं घर आणि गीतांजली शोरूमसह इतर 9 ठिकाणांवर ईडीनं आज छापे टाकले आहेत. मोदीच्या शोरूमवर टाकलेल्या छाप्यातून ईडीनं हिरे, ज्वेलरी, मौल्यवान खडे आणि सोनं असे 5 हजार 100 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. ईडीच्या एका अधिका-याने नाव न छापण्याच्या अटीवर सांंगितले की, मोदी आणि अन्य आरोपींच्या मुंबईतील पाच संपत्ती सील करण्यात आल्या आहेत. याशिवाय बँक खात्यातील रक्कम आणि फिक्स डिपॉझिटची 3.9 कोटी रुपयांची रक्कमही सील केली आहे. नीरव मोदीचा पासपोर्ट रद्द करण्यासाठी आता परराष्ट्र मंत्रालयाकडे मागणी करण्यात येणार आहे. तसेच मोदी विरोधात गुन्हाही नोंदवण्यात आला आला. सार्वजनिक क्षेत्रातील दुस-या क्रमांकाच्या पंजाब नॅशनल बँकेत 11 हजार 500 कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याचं उघड झालं. घोटाळ्यातील संशयित असलेले प्रतिष्ठित हिरे व्यावसायिक नीरव मोदी व अन्य तिघे देश सोडून परागंदा झाले आहेत.
पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील ब्रीच कँडी शाखेत हा घोटाळा झाल्याचे काल उघड झाले. हिरे व्यापारी नीरव मोदीने आपल्या मित्रांच्या सहाय्यानं पंजाब नॅशनल बँकेला हा गंडा घातल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर आज शेअर बाजारात बँकेचे शेअर जोरदार कोसळले. त्यामुळे पीएनबीने मुंबई शेअर बाजाराला पत्र लिहिलं. घोटाळ्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या सक्तवसुली संचलनालयाने याप्रकरणी घोटाळ्याचा सूत्रधार आणि प्रतिष्ठित हिरे व्यावसायिक नीरव मोदी याच्या कार्यालयांवर छापेमारी सुरु झाली आहे. नीरव मोदी याच्या मुंबईतसहीत तीन शहरांमधील शोरुम आणि कार्यालयांवर छापेमारी झाली आहे.
Visuals of items seized by Enforcement Directorate. Gold, diamonds & precious stones worth Rs 5100 crore has been seized in total. #NiravModi#PNBFraudCasepic.twitter.com/GBxSkRCubj
— ANI (@ANI) February 15, 2018
नीरव मोदीची फायरस्टार डायमंड ही कंपनी आहे. त्याला 'नीरव मोदी डायमंड ब्रँड' या नावाने भारतासह जगभरात ज्वेलरी शोरूम सुरू केली आहेत. दिल्ली, मुंबईपासून ते लंडन, हाँगकाँग आणि न्यूयॉर्कपर्यंत नीरव मोदींची 25 लग्झरी स्टोअर्स आहेत. नीरव मोदी यांच्या ज्वेलरीची किंमत 10 लाखांपासून 50 कोटी रुपयांपर्यंत आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा 'नीरव मोदी डायमंड ब्रँड'ची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. केट विंसलेट आणि डकोटा जॉनसन यांच्यासारख्या हॉलिवूड अभिनेत्री नीरव मोदींच्या ज्वेलरीच्या ग्राहक आहेत.