‘आरबीआयकडून दरवर्षी होत होते पीएनबीचे पर्यवेक्षण’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 03:28 AM2018-03-02T03:28:48+5:302018-03-02T03:28:48+5:30
पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) मुंबईतील ब्रॅडी हाऊस शाखेचे कोणत्याही प्रकारचे लेखा परीक्षण रिझर्व्ह बँकेने केले नसल्याचे वृत्त पीएनबीने फेटाळले आहे.
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) मुंबईतील ब्रॅडी हाऊस शाखेचे कोणत्याही प्रकारचे लेखा परीक्षण रिझर्व्ह बँकेने केले नसल्याचे वृत्त पीएनबीने फेटाळले आहे. रिझर्व्ह बँकेकडून दरवर्षी जोखिमेवर आधारित पर्यवेक्षण केले जात होते, असे पीएनबीने म्हटले आहे.
नीरव मोदी आणि मेहूल चोकसी यांनी पीएनबीला १२,७०० कोटींना फसविल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या लेखा परीक्षणाचा मुद्दा समोर आला होता.
रिझर्व्ह बँकेने पीएनबीच्या ब्रॅडी शाखेचे लेखा परीक्षणच केले नसल्याचे वृत्त चर्चिले जात होते. त्यावर खुलासा करणारे एक निवेदन पीएनबीने जारी केले आहे.
त्यात म्हटले की, रिझर्व्ह बँकेकडून बँकेचे दरवर्षी जोखिमेवर आधारित पर्यवेक्षण केले जात होते.