पो. नि. सालार चाऊस अखेर निलंबित

By Admin | Published: December 8, 2015 01:52 AM2015-12-08T01:52:23+5:302015-12-08T01:52:23+5:30

मंगळवेढा: पोलीस निरीक्षक सालार चाऊस यांना गुटखा प्रकरण शेवटी भोवले असून त्यांच्यावर निलंबनाची कुर्‍हाड कोसळली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातून त्यांच्या निलंबनाचे आदेश बाहेर पडले आहेत. सालार चाऊस यांना 10 डिसेंबरपर्यंत अटक करु नये म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मजूर केला आहे. तोपर्यंत कोल्हापूर येथील विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा यांनी ही कारवाई केली आहे. निलंबनाच्या कारवाईचे आदेश मंगळवेढय़ात पोहोचले असून हे आदेश घेऊन एक पोलीस अधिकारी लातूर येथे सालार चाऊस यांना बजावण्यासाठी गेले आहेत.

Po N Salar Chase finally suspended | पो. नि. सालार चाऊस अखेर निलंबित

पो. नि. सालार चाऊस अखेर निलंबित

googlenewsNext
गळवेढा: पोलीस निरीक्षक सालार चाऊस यांना गुटखा प्रकरण शेवटी भोवले असून त्यांच्यावर निलंबनाची कुर्‍हाड कोसळली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातून त्यांच्या निलंबनाचे आदेश बाहेर पडले आहेत. सालार चाऊस यांना 10 डिसेंबरपर्यंत अटक करु नये म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मजूर केला आहे. तोपर्यंत कोल्हापूर येथील विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा यांनी ही कारवाई केली आहे. निलंबनाच्या कारवाईचे आदेश मंगळवेढय़ात पोहोचले असून हे आदेश घेऊन एक पोलीस अधिकारी लातूर येथे सालार चाऊस यांना बजावण्यासाठी गेले आहेत.
कर्नाटकातून आलेला गुटखा पंढरपूरपर्यंत सुरक्षितपणे सोडण्यासाठी तीन पोलीस कर्मचार्‍यांना साडेसोळा लाख रुपयांच्या गुटख्यासाठी साडेपाच लाख रुपये लाच घेतली होती. याबाबतची क्लीप व्हॉट्सअँपवर व्हायरल झाली होती. मंगळवेढय़ातून गुटखा पंढरपूरमार्गे नगर, धुळे भागात जाणार होता. याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख वीरेश प्रभू यांना मिळाल्यानंतर त्यांनी पंढरपूरचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांना गुटख्याचा टेम्पो बदलण्याबद्दल आदेश दिले. अनवली येथील टोल नाक्याजवळ साडेसोळा लाख रुपयांचा गुटखा पकडण्यात आला. याबाबत उपविभागीय अधिकारी जाधव, पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित त्रिपुटे हे तपास करत होते. त्यांनी तीन पोलीस कर्मचार्‍यांना अटक केली. त्यांच्या तपासात पोलीस निरीक्षक सालार चाऊस यांचे नाव निष्पन्न झाले. यामुळे चाऊस यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. ते आजारी पडल्यामुळे त्यांची अटक टळली. नंतर मुंबई उच्च नयायालयाने अंतरिम जामीन दिला. याबाबत 10 डिसेंबर रोजी अंतिम सुनावणी होणार आहे, अशा परिस्थितीत सोमवारी रात्री सालार चाऊस यांना निलंबित करण्यात आले. यामुळे गुटखा प्रकरण आतापर्यंत तीन पोलीस व एक अधिकारी यांना भोवले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Po N Salar Chase finally suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.