मुस्लीम विवाहांनाही ‘पॉक्सो’ लागू : कोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 10:14 AM2022-11-21T10:14:21+5:302022-11-21T10:14:53+5:30
अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या एका मुस्लिम व्यक्तीने जामिनासाठी न्यायालयासमोर अर्ज दाखल केला होता.
कोची : मुस्लिम समाजातील विवाहांना पॉक्सो कायदा लागू होतो, असा महत्त्वपूर्ण निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिला. मुस्लिम समाजातील विवाहामध्ये दाम्पत्यापैकी एक व्यक्ती अल्पवयीन असेल तर त्यासंदर्भातील गुन्ह्यात पॉक्सो कायदा लागू होतो, असेही यावेळी म्हटले आहे.
अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या एका मुस्लिम व्यक्तीने जामिनासाठी न्यायालयासमोर अर्ज दाखल केला होता.
अत्याचारप्रकरणी पॉक्सोनुसारच कारवाई
आरोपीच्या जामीन अर्जाबाबत निकाल देताना केरळ उच्च न्यायालयाचे न्या. बेचू कुरैन थॉमस यांनी म्हटले आहे की, शरियत कायद्यानुसार विवाह झालेला असला तरी त्या दाम्पत्यात कोणी अल्पवयीन असेल व काही गुन्हा घडला असेल तर त्याला पोक्सो कायदा लागू होतो. २००६ साली बालविवाह प्रतिबंधक कायदादेखील देशात अस्तित्वात आला, याचीही सर्व संबंधितांनी नोंद घेतली पाहिजे, असे निकालपत्रात म्हटले आहे.