विशाखापट्टणममधील गॅसगळतीसाठी हा विषारी वायू ठरला कारणीभूत, कशासाठी होतो त्याचा वापर? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 01:31 PM2020-05-07T13:31:18+5:302020-05-07T13:42:12+5:30
विशाखापट्टणममध्ये झालेल्या या गॅस गळतीसाठी नेमका कुठला विषारी वायू कारणीभूत ठरला. या कंपनीमध्ये नेमके बनते काय? आणि तिथे या गॅसचा वापर कशासाठी होतो. असे अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत.
विशाखापट्टणम - एकीकडे देश कोरोना विषाणूच्या संकटात सापडला असतानाच आज आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथे विषारी गॅस गळतीमुळे भीतीचे वातावरण पसरले. या गॅस गळतीमुळे शहरात आतापर्यंत ८ ते १० जणांच्या मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. तसेच हजारो नागरिक आजारी पडले आहे. दरम्यान, विशाखापट्टणममध्ये झालेल्या या गॅस गळतीसाठी नेमका कुठला विषारी वायू कारणीभूत ठरला. या कंपनीमध्ये नेमके बनते काय? आणि तिथे या गॅसचा वापर कशासाठी होतो. असे अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत. या प्रश्नांची उत्तरं खालील प्रमाणे आहेत.
विशाखापट्टणममधील विशाखा एलजी पॉलिमर कंपनीतून जो विषारी वायू लिक झाला आहे त्याचं नाव स्टीरीन आहे. या वायूला एथनीलबेन्झीन असेही म्हणतात. हे एक सिंथेटिक केमिकल आहे. हे केमिकल रंगहीन द्रव्याच्या रूपात असते. मात्र बराच वेळ हा गॅस ठेवला तर तो हलक्या पिवळ्या रंगाचा दिसतो.
Andhra Pradesh: Visakhapatnam District Collector Vinay Chand visited King George Hospital where people affected by #VizagGasLeak are being treated. pic.twitter.com/tEZLriS82b
— ANI (@ANI) May 7, 2020
स्टीरीन हा अत्यंत ज्वालाग्राही असतो. त्यामुळे त्याचे ज्वलन होते तेव्हा मोठ्या प्रमाणात विषारी वायूचे उत्सर्जन होते. होमी भाभा कॅन्सर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे माजी संचालक डॉक्टर डी. रघुनाथ राव यांनी सांगितले की, स्टीरीन गॅसचा वापर मुख्यत्वेकरून पॉलिस्टिरीन प्लॅस्टिक बनवण्यासाठी केला जातो.
महत्वाच्या बातम्या...
मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा १०००० पार; आज ७५९ नवे रुग्ण
OMG! राज्यात कोरोनाचा 'विस्फोट'; नव्या रुग्णांच्या संख्येने सरकारची चिंता वाढली
CoronaVirus धारावीने चिंता वाढवली; नव्या रुग्णांमध्ये मोठी वाढ
CoronaVirus व्वा...! राज्यात केवळ दोन दिवसांत ७०० रुग्ण ठणठणीत झाले
विशाखापट्टणममधील या फार्मा कंपनीत झालेल्या या गॅसगळतीमुळे आतापर्यंत ८ ते १० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या गॅस गळतीमुळे सुमारे एक हजार लोक बाधित झाले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सुमारे तीन किलोमीटरच्या परिसरात या वायू गळतीचा प्रभाव दिसून आला आहे. स्थानिक प्रशासन आणि नौदलाच्या जवानांनी कंपनीच्या आसपासच्या गावातून स्थानिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.