कामठीत विषारी दारू

By Admin | Published: August 7, 2015 12:06 AM2015-08-07T00:06:59+5:302015-08-07T00:06:59+5:30

कामठी छावणीत विषारी

Poisonous liquor | कामठीत विषारी दारू

कामठीत विषारी दारू

googlenewsNext
मठी छावणीत विषारी
दारू, गंभीर धोक्याची भीती
नागपूर : कामठी कॅन्टॉनमेंट एरियातील ग्रीन टाऊन भागात मोठ्या प्रमाणावर मोहफुलाच्या हातभट्टीची आणि मध्य प्रदेशातून आणलेली विषारी दारू सर्रास विकली जात असून, भविष्यात गंभीर धोका होण्याची भीती येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
अड्डाचालक हा या भागातील सभ्य नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी गुंड टोळ्यांची मदत घेतो. त्यामुळे उघडपणे कोणीही पोलिसात तक्रार करण्याचे धाडस करीत नाही. याशिवाय त्याचे काही पोलीस अधिकाऱ्यांशी नजीकचे संबंध असल्याने त्याचा धंदा या भागात बिनधास्त सुरू आहे. हा अड्डाचालक रॉकेल, कोळसा, भंगारचा अवैध धंदा करणाऱ्यांकडून मांडवली आणि वसुली करून मोठा वाटा खास पोलीस अधिकाऱ्यांकडे पोहोचवीत असतो, याशिवाय त्यांना मोठी मेजवानीही देत असतो. याच अड्ड्यावरून दारूबंदी असलेल्या चंद्रपूर येथे मोठ्या प्रमाणावर विषारी मद्याची खेप पोहोचविली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कारवाई करून विषारी दारूचा हा अड्डा ताबडतोब बंद करण्यात यावा आणि मुंबईनजीकच्या मालवणी भागातील मृत्युकांडाची पुनरावृत्ती टाळण्यात यावी, अशी या भागातील सभ्य नागरिकांची हाक आहे.

Web Title: Poisonous liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.