पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणारच: अमित शाह
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 09:54 AM2024-05-16T09:54:08+5:302024-05-16T09:56:43+5:30
पाकिस्तानव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून, आम्ही तो ताब्यात घेणारच, असा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला.
सेरामपूर : पाकिस्तानव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून, आम्ही तो ताब्यात घेणारच, असा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी व्यक्त केला. पश्चिम बंगालमधील सेरामपूर येथील प्रचारसभेत ते म्हणाले की, एकेकाळी अशांत असलेल्या काश्मीरमध्ये ३७० कलम रद्द केल्यानंतर शांतता प्रस्थापित झाली आहे.
त्यांनी सांगितले की, आधी काश्मीरमध्ये स्वतंत्र होण्याचे नारे दिले जायचे, दगडफेकीच्या घटना घडायच्या. तिथले सगळे प्रकार आता बंद झाले; पण, आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये निदर्शने होऊ लागली आहेत. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असल्यामुळे आपण पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू नये, असे मणिशंकर अय्यर यांच्यासारख्या काँग्रेस नेत्यांचे मत आहे. नरेंद्र मोदी यांच्यासारखा प्रामाणिक नेता निवडायचा की इंडिया आघाडीतील भ्रष्टाचारी नेत्यांना निवडायचे, याचा निर्णय यंदाच्या लोकसभा निवडणुकांत मतदारांना घ्यावा लागणार आहे. (वृत्तसंस्था)