ग्रामीण पोलिसांनी लावला तीन टोळ्यांविरुद्ध मोक्का * पोलिसांचा धडाका : आप्पा लोंढेच्या खुनातील आरोपींसह ४२ जणांवर कारवाई

By admin | Published: July 31, 2015 10:25 PM2015-07-31T22:25:14+5:302015-07-31T22:25:14+5:30

A police action against the three people launched by the rural police in Moka * police action: 42 people including Appa La Londhe murder accused | ग्रामीण पोलिसांनी लावला तीन टोळ्यांविरुद्ध मोक्का * पोलिसांचा धडाका : आप्पा लोंढेच्या खुनातील आरोपींसह ४२ जणांवर कारवाई

ग्रामीण पोलिसांनी लावला तीन टोळ्यांविरुद्ध मोक्का * पोलिसांचा धडाका : आप्पा लोंढेच्या खुनातील आरोपींसह ४२ जणांवर कारवाई

Next
>पुणे : कुख्यात गुंड आप्पा लोंढे याच्या खुनातील मुख्य सुत्रधारासह सासवड, जेजुरी आणि लोणी काळभोर या परिसरातील 3 गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी विरोधी कायदा (मोक्का) नुसार कारवाई केली आहे. या ३ टोळ्यांच्या एकूण ४२ सराईत गुंडांवर एकाच वेळी कारवाई करण्याच्या प्रस्तावाला कोल्हापुर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (आयजी) संजय वर्मा यांनी मंजुरी दिल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम जाधव यांनी दिली.
जिल्ह्यामध्ये सध्या सक्रीय असलेल्या पंधरा पेक्षा अधिक टोळ्यांविरुद्ध मोक्काचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. लोंढे याच्या खुनातील प्रमुख आरोपी गोरख बबन कानकाटे याच्या टोळीचा खुनातील सहभाग स्पष्ट झाला होता. कानकाटेसह त्याचे साथीदार प्रविण मारूती कुंजीर (रा. वळती ता. हवेली), विष्णू यशवंत जाधव (रा. सोरतापवाडी ता. हवली), आण्णा उर्फ बबड्या किसन गवारी, विकास प्रभाकर यादव, प्रमोद उर्फ बापू काळूराम कांचन व रविंद्र शंकर गायकवाड, आकाश सुनिल महाडीक (रा. सर्वजण उरूळी कांचन ता. हवेली), संतोष भिमराव शिंदे, राजेंद्र विजय गायकवाड (रा. दोघेही शिंदवणे ता. हवेली), नागेश लक्ष्मण झाडकर, नितीन महादेव मोगल, निलेश खंडू सोलनकर (रा. डाळिंब ता. दौंड) व मणी कुमार चंद्रा उर्फ आण्णा (वय ५०, रा. येरवडा, पुणे) यांच्यावर मोक्का लावण्यात आला आहे.कानकाटे, प्रविण कुंजीर, अण्णा गवारी, सोमनाथ कांचन, विकास यादव, बापु कांचन, व रविंद्र गायकवाड हे अद्याप फरार आहेत.
जेजुरी येथे एका बॅंकेची एटीएम व्हॅन अडवून त्यावर दरोडा टाकणा-या महेश चंद्रकांत कमलापुरे (वय १९, रा. संत रोहिदासनगर, खडकवासला), स्वप्नील उर्फ पिंट्या रतन पवार (वय २०, रा. आंबेगाव पठारे), सुरज शंकर पवळे (वय २०), आकाश बाळासाहेब खोमणे (वय १९, रा. धायरी गाव, ता. हवेली), मन्सुर उर्फ लालू इक्बाल फुटाणकर (वय २८, रा. आंबेगाव पठार), विकास उर्फ आल्या रघुनाथ जाधव (वय 22, रा. इंदिरानगर वस्ती, इंदिरानगर, हांडेवाडी रोडे), सचिन दत्तात्रय दर्गे (वय 24, रा. साई शक्ती चौक, आंबेगाव पठारे), जगदिप उर्फ जयदिप जगदिश परदेशी (वय २८, रा.वारजेे), राजकुमार बब्रुवान डांगे (वय २९, रा. न-हे रोड, धायरी फाटा), विशाल उर्फ आल्या अरूण वाल्हेकर (वय २२, रा. पारे कंपनीजवळ न-हे रोड, धायरी), ऋषीकेष उर्फ हुक्का श्रीकांत गाडे (रा. बिबबेवाडी) व गणेश डोंगरे (रा. बनेकर वस्ती, धायरी, पुणे) यांच्याविरूध्द देखील मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
शरद मोहोळ टोळीवर अपहरण आणि दरोड्याचा गुन्हा सासवड पोलीस ठाण्यात दाखल होता़शरद रामभाऊ मोहोळ (रा. कोथरूड पुणे), पप्पू गणपत उत्तेकर (वय २५, रा.मुठा, ता. मुळशी), हर्षल उर्फ हर्षद उर्फ हरीष उर्फ हरीश्चंद्र विष्णू मोरे (वय ३० रा. सुतारदरा, कोथरूड), राहुल रमेश तोंडे (वय २५, रा. खेचरे, ता. मुळशी), अमोल बापू येवले (वय २३, रा.येवलेवस्ती पेरणे ता. हवेली), विजय बबन तोंडे (वय २७, रा. सुतारदरा, कोथरूड), अमित भाऊसाहेब पोकळे (वय २४, रा. कुंभार चावडीजवळ, धायरी गाव, ता. हवेली), दत्ता अरूण कदम (वय २४, जनता वसाहत, राममंदिराशेजारी, पर्वती पायथा), प्रविण पोपट शेलार (वय २५, रा. शिवतेजनगर, बिबवेवाडी), सागर दगडु कांबळे (वय २४, रा. निवे, ता. मुळशी), रामदास गोविंद वांजळे (रा. अहिरेगाव, वारजे माळवाडी), समीर हरिभाऊ हारपुडे (रा. सुतारदरा, कोथरूड), शेखर आप्पा उरकडे (रा. सुतारदरा, कोथरूड), अमित सुरेश कदम (रा. धायरीगाव), अक्षय उर्फ आकाश चंद्रकांत पाटील (रा. सुर्वे कॉलनी, वारजे माळवाडी) या पंधरा आरोपींच्या विरुध्द मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.५ जण अद्याप फरारी आहेत़ या टोळ्यांवर मोक्काची कारवाई करण्याचे प्रस्ताव एलसीबीने जिल्हा अधीक्षक डॉ. जय जाधव यांच्या मार्फत कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा यांच्याकडे पाठवला होता.
--चौकट--
पुणे जिल्ह्यामध्ये सध्या कार्यरत असलेल्या २५ पेक्षा अधिक गुन्हेगारी टोळ्यांची सखोल माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे. या टोळ्यांचे कंबरडे मोडण्यासाठी लवकरच कलम ५५ अंतर्गत तडीपारीची कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हा अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी एलसीबीसह सर्वच स्थानिक पोलिसांना दिले आहेत.

Web Title: A police action against the three people launched by the rural police in Moka * police action: 42 people including Appa La Londhe murder accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.