गर्लफ्रेंडसाठी मित्राची हत्या, बाइकवर लावलेल्या स्टिकरच्या आधारे पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 08:31 AM2017-10-31T08:31:52+5:302017-10-31T08:33:26+5:30

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना आरोपींच्या बाइकवर लावण्यात आलेला स्टिकर दिसला. याच स्टिकरच्या आधारे पोलिसांनी 24 तासाच गुन्ह्याचा उलगडा करत आरोपींना अटक केली. 

Police arrest murder accused with help of bike sticker | गर्लफ्रेंडसाठी मित्राची हत्या, बाइकवर लावलेल्या स्टिकरच्या आधारे पोलिसांनी केली अटक

गर्लफ्रेंडसाठी मित्राची हत्या, बाइकवर लावलेल्या स्टिकरच्या आधारे पोलिसांनी केली अटक

Next
ठळक मुद्देगळा दाबून एका तरुणाची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहेखंडणीसाठी हत्या झाली असल्याचं भासवण्यासाठी मृत तरुणाच्या घरी फोन करुन 20 लाख रुपयांची मागणी केलीबाइकवरील स्टिकरच्या आधारे पोलिसांनी 24 तासाच गुन्ह्याचा उलगडा करत आरोपींना अटक केली

नवी दिल्ली - गळा दाबून एका तरुणाची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. नवीन सिंह (20) आणि आकाश चौधरी उर्प आशू (23) अशी आरोपींची ओळख पटली आहे. दोघेही छतपूर पहाडीचे राहणारे आहेत. पोलिसांनी दोघा आरोपींसोबत एका अल्पवयीन तरुणालाही ताब्यात घेतलं आहे. आरोपींनी तरुणाची हत्या केल्यानंतर खंडणीसाठी हत्या झाली असल्याचं भासवण्यासाठी मृत तरुणाच्या घरी फोन करुन 20 लाख रुपयांची मागणी केली. यानंतर मोबाइल फोन बंद करुन नाल्यात फेकून दिला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना आरोपींच्या बाइकवर लावण्यात आलेला स्टिकर दिसला. याच स्टिकरच्या आधारे पोलिसांनी 24 तासाच गुन्ह्याचा उलगडा करत आरोपींना अटक केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छतरपूर परिसरात राहणारा जयदीप गोयल उर्फ जतिन (17) शनिवारी संध्याकाळी आपली स्कूटी घेऊन दर्शनासाठी शनी मंदिरात गेला होता. पण त्यानंतर तो घरी परतलाच नाही. जतिनचे वडिल एक व्यवसायिक आहेत. जतिन सरस्वती बाल विद्यालयात 11 वीत शिकत होता. शोध घेऊनही जतीनचा पत्ता लागत नव्हता. रात्री जवळपास 9.30 वाजता जतिनच्या घरच्यांना एक फोन आला, ज्यामध्ये कॉलरने जतिनचं अपहरण झालं असून सुटका करण्यासाठी 20 लाख रुपयांची खंडणी मागितली. 

पोलिसांनी जतिनच्या मोबाइलला ट्रॅक करण्यास सुरुवात केली. पण कॉल आल्यानंतर जतिनचा मोबाइल पुन्हा एकदा बंद झाला. पोलिसांनी काही पुरावा हाती लागतोय का यासाठी शनी मंदिराजवळ शोध घेतला असता जतिनची स्कूटी सापडली. याच परिसरात लागलेल्या सीसीटीव्हींची तपासणी केली असता, जतिन काही तरुणांसोबत एका बुलेटवरुन जात असताना दिसलं.  त्या तरुणांनी तोंडावर रुमाल बांधला होता. बाइकच्या मागे एक स्टिकर चिकटवण्यात आला होता, ज्यावर एका जात प्रमुखाचा उल्लेख होता. या स्टिकरमुळे पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा लागला. पोलिसांनी जतिनच्या मित्रांना बाइकचा फोटो दाखवला असता, ही बाइक जतिनचा मित्र आकाश उर्फ आशूची असल्याचं समजलं. पोलिसांनी आकाशला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, संपुर्ण घटनेचा उलगडा झाला. यानंतर पोलिसांनी नवीन आणि आशू यांना अटक केली. 

चौकशीदरम्यान हे सर्व तरुण एकमेकांना चांगले ओळखत असल्याचं समोर आलं. जतीन आपल्या प्रेयसीच्या जवळ जात असल्याचा संशय नवीनला होता. त्यामुळेच त्याने जतिनच्या हत्येचा प्लान आखला होता. 

Web Title: Police arrest murder accused with help of bike sticker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.