Bulandshahr Violence : मुख्य सुत्रधार योगेश राजला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 10:36 AM2019-01-03T10:36:44+5:302019-01-03T10:54:49+5:30

उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरमध्ये कथित गाईच्या हत्येवरून उसळलेल्या दंगलीवेळी पोलीस निरिक्षकाची गोळी मारून हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश राज याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Police arrests Yogesh Raj, the main accused in Bulandshahr violence case | Bulandshahr Violence : मुख्य सुत्रधार योगेश राजला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Bulandshahr Violence : मुख्य सुत्रधार योगेश राजला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Next
ठळक मुद्देBulandshahr Violence : मुख्य आरोपी योगेश राज याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. हिंसाचारानंतर योगेश फरार होता. याप्रकरणी आतापर्यंत 32 आरोपींना अटक करण्यात आली आहे. चांदपूर पुठी गावाचे सतीशकुमार आणि महाब येथील विनितकुमार हे बुधवारी कोर्टासमोर शरण आले.

बुलंदशहर : उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरमध्ये कथित गाईच्या हत्येवरून उसळलेल्या दंगलीवेळी पोलीस निरिक्षकाची गोळी मारून हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश राज याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. हिंसाचारानंतर योगेश फरार होता. याप्रकरणी आतापर्यंत 32 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

बुलंदशहरच्या बीबीनगर पोलिसांनी योगेश राजला अटक केली आहे. याआधी याप्रकरणी प्रशांत नटला अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. चांदपूर पुठी गावाचे सतीशकुमार आणि महाब येथील विनितकुमार हे बुधवारी कोर्टासमोर शरण आले. एसएसपी प्रकाश चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी फरार असलेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. लवकरच अन्य आरोपींनाही ताब्यात घेण्यात येईल. 


बुलंदशहर हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत 32 जणांना अटक केली आहे. बुलंदशहर जिल्ह्यातील स्यानामधील एका गावात शेतात गोवंशाचे अवशेष आढळले होते. त्यानंतर संतप्त झालेल्या लोकांनी रास्ता रोको केला. त्यावेळी पोलीस आणि जमावामध्ये वादावादी झाली होती. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी जमावावर गोळीबार केला. यात एक तरुण गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर संतप्त जमावाने पोलीस ठाण्यावर हल्ला केला. तसेच मोठ्या प्रमाणावर मोडतोड आणि जाळपोळ केली. यात पोलीस अधिकारी सुबोध कुमार सिंह गंभीर जखमी झाले. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. तसेच एक दंगलखोरही या हिंसाचारात मृत्युमुखी पडला. 



 

Web Title: Police arrests Yogesh Raj, the main accused in Bulandshahr violence case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.