तोतया पोलीस गजाआड
By admin | Published: February 10, 2015 12:55 AM2015-02-10T00:55:45+5:302015-02-10T00:55:45+5:30
कारवाईचा धाक : पाच हजार उकळले
Next
क रवाईचा धाक : पाच हजार उकळलेनागपूर : एकांतात गप्पा करीत बसलेल्या तरुण-तरुणीला कारवाईचा धाक दाखवून तोतया पोलिसाने पाच हजार रुपये उकळले. ईसासनी परिसरात शनिवारी सकाळी ११ वाजता ही घटना घडली. दरम्यान, तक्रार मिळताच एमआयडीसी पोलिसांनी धावपळ करून आरोपी तोतया पोलिसाला गजाआड केले. अवधेश सूरज पांडे (वय ३०) असे आरोपीचे नाव आहे. तो अजनीतील भगवाननगरात (कुकडे लेआऊट) राहातो. विशाल मुरलीधर सागरकर (वय २१, मधुबन कॉलनी, हिंगणा) आणि त्याची मैत्रीण ईसासनी परिसरात शनिवारी सकाळी गप्पा करीत बसले होते. आरोपी पांडे तेथे आला. त्याने आपण पोलीस आहो, असे सांगून बनावट ओळखपत्रही दाखवले. विशाल तसेच त्याच्या मैत्रिणीला दमदाटी करून तुमच्यावर कारवाई करतो आणि दोघांच्या घरी कळवितो,अशी धमकी दिली. घाबरलेल्या विशालने त्याला विनवण्या केल्या. त्यामुळे कारवाई टाळायची असेल तर पाच हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. कारवाई आणि बदनामीच्या धाकामुळे विशालने आरोपी पांडेला पाच हजार रुपये दिले. दरम्यान, नंतर तो पुन्हा पैशाची मागणी करू लागला. त्यामुळे विशालला संशय आला. त्याने एमआयडीसी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून रविवारी रात्री पांडेला अटक केली. त्याचा आज कोर्टातून एक दिवसाचा पीसीआर मिळवला. या बनवेगिरीत त्याचे आणखी कुणी साथीदार आहेत काय आणि त्याने अशाच प्रकारे आणखी काही गुन्हे केले काय, त्याचा तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत. -----