सीसीटीव्हीतील त्या इसमाचा पोलिसांकडून शोध सुरू
By Admin | Published: January 7, 2017 08:39 PM2017-01-07T20:39:12+5:302017-01-07T20:39:12+5:30
जळगाव : सिंधी कॉलनीतील सेवा मंडळ कार्यालयापुढील कॉस्मेटीक साहित्याच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना २ रोजी रात्री घडली होती़ शॉटसर्किटने आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता़ मात्र येथील रहिवाश्यांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधारावर घेवून कुणीतरी आग लावल्याचा संशय व्यक्त केला आहे़ दरम्यान एमआयडीसी पोलिसांकडून याप्रकरणी तपासाला गती मिळाली असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत असलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे़
ज गाव : सिंधी कॉलनीतील सेवा मंडळ कार्यालयापुढील कॉस्मेटीक साहित्याच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना २ रोजी रात्री घडली होती़ शॉटसर्किटने आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता़ मात्र येथील रहिवाश्यांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधारावर घेवून कुणीतरी आग लावल्याचा संशय व्यक्त केला आहे़ दरम्यान एमआयडीसी पोलिसांकडून याप्रकरणी तपासाला गती मिळाली असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत असलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे़सेवा मंडळाजवळ चंदन ॲन्ड इंटरप्रायझेस कॉस्मेटीकच्या गोडाऊनला आग लागून सात लाखांचे नुकसान झाले होते़ या गोडाऊननजीक इमारतीत ओम प्रकाश मलीक व चंदन मलीक यांचे कुटूंब राहते़ आगीच्या घटनेनंतर संबंधितांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते़ अग्निशमन बंबाने आगीवर नियंत्रण मिळविले होते़ या गोडाऊनलगत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये आगीची घटना घडल्यापूर्वी एक इसम प्रवेश करताना व बाहेर येताना दिसून येत आहे़ तपासधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक आढाव यांनी सदरचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्या दिशेने तपास सुरू केला आहे़ कोट- ताब्यात घेतलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये गोडाऊनमध्ये प्रवेश करताना व परत सायकल घेवून जाताना एक इसम दिसून येत आहे़ मात्र त्याचा चेहरा स्पष्ट अस्पष्ट दिसून येत असल्याने ओळख पटविण्यास अडचणी आहेत़ तरी त्यापध्दतीने तपासाला गती देण्यात आली आहे़ आग लावल्याबाबत कुठलीही तक्रार आलेली नाही़ फुटेजमधील इसमाचा शोध घेतल्याप्रकार आग लागली की, कुणी लावली या प्रश्नांची उत्तरे स्पष्ट होतील़- विजय आढाव, तपासधिकारी़