3 मुलांची आई असलेली 45 वर्षांची महिला पडली 26 वर्षीय मुलाच्या प्रेमात; पोलिसांनी लावलं लग्न अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 01:09 PM2022-12-06T13:09:33+5:302022-12-06T13:14:04+5:30

महिला आणि तिच्या प्रियकराला एकमेकांशी लग्न करायचं होतं. पण कुटुंबीयांनी याला जोरदार विरोध केला.

police conducted marriage between 45 year old woman and 26 year old boyfriend in police station | 3 मुलांची आई असलेली 45 वर्षांची महिला पडली 26 वर्षीय मुलाच्या प्रेमात; पोलिसांनी लावलं लग्न अन्...

3 मुलांची आई असलेली 45 वर्षांची महिला पडली 26 वर्षीय मुलाच्या प्रेमात; पोलिसांनी लावलं लग्न अन्...

googlenewsNext

लखनौमध्ये एक अजब घटना घडली आहे. एक 45 वर्षांची महिला 26 वर्षीय मुलाच्या प्रेमात पडली आहे. एवढच नाही तर पोलिसांच्या उपस्थितीत लग्न देखील केलं, पोलीस ठाण्यात रंगलेल्या या विवाहसोहळ्या पोलीस कर्मचारीच वऱ्हाडी झाले होते. सध्या या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच्या पतीचं 15 वर्षांपूर्वीच निधन झालं आहे. तिला दोन मुलं आणि एक मुलगी अशी तीन मुलं आहेत. 

महिला प्रियकराशी लग्न करण्यासाठी अडून बसली होती. तसेच तिने तरुणाविरोधात तक्रार देखील केली होती. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजुच्या नातेवाईकांना बोलावलं आणि कुटुंबीयांची परवानगी घेऊन दोघांचं पोलीस ठाण्यातच लग्न लावून दिल्याची घटना घडली आहे. हिंदू रिती रिवाजानुसार लग्नसोहळा पार पडला. पोलिसांकडून नातेवाईकांसाठी जेवणाची देखील सोय करण्यात आली होती. 

चिरंजीवी नाथ सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आणि तिच्या प्रियकराला एकमेकांशी लग्न करायचं होतं. पण कुटुंबीयांनी याला जोरदार विरोध केला. पण पोलीस ठाण्यात आल्यावर नातेवाईकांना समजावण्यात आलं आणि ते तयार झाले. दोन्ही कुटुंबीयांनी लग्नासाठी परवानगी दिली. यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत लग्न पार पडलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: police conducted marriage between 45 year old woman and 26 year old boyfriend in police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न