Pulwama Attack : कॉन्स्टेबलचा अनोखा आदर्श, शहिदांच्या मदतीसाठी तो करतोय पैसे जमा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 01:06 PM2019-02-21T13:06:49+5:302019-02-21T13:29:30+5:30
उत्तर प्रदेशमधील एक पोलीस कॉन्स्टेबल तीन दिवसांची सुट्टी घेऊन शहीदांच्या कुटुंबीयांसाठी निधी गोळा करत आहेत. फिरोज खान असं या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे.
रामपूर - पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत. अवंतीपुरा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. उत्तर प्रदेशमधील एक पोलीस कॉन्स्टेबल तीन दिवसांची सुट्टी घेऊन शहीदांच्या कुटुंबीयांसाठी निधी गोळा करत आहेत. फिरोज खान असं या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे. फिरोज खान लोकांना मदत करण्याचं आवाहन करत आहेत.
फिरोज खान यांनी 'मी निधी गोळा करण्यासाठी तीन दिवसांची सुट्टी मागितली आणि ती मंजूर झाली. मला जे शक्य आहे ते मी करत आहे. मला लोकांचा चांगला पाठिंबा मिळत आहे' असे म्हटले आहे. एक बोर्ड घेऊन दुचाकीवरून फिरोज खान शहरभर फिरत आहेत शहिदांच्या कुटुंबीयांसाठी निधी जमा करण्यास मदत करा असं या बोर्डवर लिहिलं आहे. गुरुवारी (14 फेब्रुवारी) जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यानंतर सोशल मीडियावरुन नेटीझन्सने संताप व्यक्त केला आहे.
Rampur: UP Police Constable Firoz Khan is collecting funds for families of CRPF jawans who lost their lives in #PulwamaAttack. Khan says 'I requested and got permission to move around the city for 3 days and collect funds, its the least I can do.I am getting support of all' pic.twitter.com/ShTaQHK2tG
— ANI UP (@ANINewsUP) February 21, 2019
काश्मीरमधील तरुणांना लष्करात जायचंय; 111 जागांसाठी तब्बल 2500 अर्ज
पुलवामा हल्ल्यानंतर हजारो तरुण लष्करात जाण्यास उत्सुक आहेत. बारामुल्ला येथे भारतीय लष्कराने 111 जागांसाठी भरती सुरू केली आहे. 111 जागांसाठी तब्बल 2500 तरुणांनी अर्ज करत लष्करात भरती होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. लष्करातील भरतीला काश्मिरी तरुणांनी चांगलाच प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळत आहे. 'लष्करात भरती होऊन देशसेवा करण्याची संधी आम्हाला मिळत आहे. आम्हाला नोकरीची फार कमी संधी आहे. लष्करात भरती होऊन आम्ही आमच्या कुटुंबाची सुरक्षा करू शकतो सोबत काळजीदेखील घेऊ शकतो' असं भरतीसाठी आलेल्या बिलाल अहमद या तरुणाने म्हटले आहे. तर 'आम्ही काश्मीरच्या बाहेर जाऊ शकत नाही. आमच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. काश्मीरमधील जवानांना संवेदनशील परिसरांमध्ये तैनात केलं तर ते स्थानिकांशी चर्चा करत जास्त चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळू शकतात' असं ही एका तरुणाने सांगितलं आहे.
पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार अब्दुल रशीद गाझीचा खात्मा केल्यानंतर भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना आणि त्यांना पोसणाऱ्यांना कठोर इशारा दिला आहे. दहशतवाद्यांनी एकतर हत्यारं सोडून समर्पण करावं किंवा मग मरणास सामोरं जाण्यास तयार राहावे, असा स्पष्ट इशाराच भारतीय लष्कराने पत्रकार परिषदेत दिला आहे. ''दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदवर पाकिस्तानी सैन्य आणि ISIचा वरदहस्त आहे. जैश-ए-मोहम्मद पाकिस्तानी सैन्याचंच अपत्य आहे'',असा थेट निशाणाच भारतीय लष्कराने पाकिस्तानवर केला आहे. तसंच आगामी काळातही दहशतवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र स्वरुपात राबवली जाईल आणि काश्मीर खोऱ्यात घुसखोरी करणाऱ्या प्रत्येक दहशतवाद्याचा खात्मा केला जाईल. त्यांना जिवंत सोडलं जाणार नाही', असेही भारतीय लष्कराने ठणकावून सांगितले आहे.