गोहत्या प्रकरणात 2 अल्पवयीन मुलींसह 9 जणांना पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2017 10:41 AM2017-12-31T10:41:29+5:302017-12-31T10:44:07+5:30

लखनऊः उत्तर प्रदेशमधल्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात गोहत्या प्रकरणात पोलिसांनी चक्क दोन अल्पवयीन मुलींना पोलिसांनी जेलमध्ये पाठवलं आहे. पोलिसांनी गोहत्या प्रकरणात दोन अल्पवयीन मुलींसह एकूण 9 जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

Police custody for 9 persons including 2 minor girls in cow slaughter case | गोहत्या प्रकरणात 2 अल्पवयीन मुलींसह 9 जणांना पोलीस कोठडी

गोहत्या प्रकरणात 2 अल्पवयीन मुलींसह 9 जणांना पोलीस कोठडी

Next

लखनऊः उत्तर प्रदेशमधल्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात गोहत्या प्रकरणात पोलिसांनी चक्क दोन अल्पवयीन मुलींना पोलिसांनी जेलमध्ये पाठवलं आहे. पोलिसांनी गोहत्या प्रकरणात दोन अल्पवयीन मुलींसह एकूण 9 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. दोन्ही मुलींना पोलिसांनी सज्ञान असल्याचं सांगत न्यायालयात हजर केलं होतं. न्यायालयानंही त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे, असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.

भारतात गोहत्या करण्यास बंदी असतानाही उत्तर प्रदेशमध्ये ही घटना घडली आहे. चार आरोपींनी पलायन केलं असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या सर्व आरोपींना न्यायालयानं पोलीस कोठडीत पाठवलं आहे. 12 वर्षं आणि 16 वर्षं वयाच्या या दोन्ही मुलींना बालसुधारगृहात पाठवणं आवश्यक होतं. परंतु तसं न करत पोलिसांनी न्यायालयाची दिशाभूल करत त्यांना पोलीस कोठडी दिली आहे. आधार कार्ड पाहिल्यानंतर मुली अल्पवयीन असल्याचं उघड झालं आहे.

एका मुलीचा जन्म 2001 साली, तर दुसरीचा जन्म 2005 साली झाल्याचं आधार कार्डमुळे स्पष्ट झालं आहे. 29 डिसेंबर रोजी पोलिसांनी  मुजफ्फरपूरमधल्या दोन घरांवर छापेमारी केली होती. छाप्यादरम्यान पोलिसांना या दोन्ही घरात गोमांस आढळून आले. या प्रकरणात पोलिसांनी 5 महिलांसह एकूण 9 जणांना अटक केली होती. परंतु या अल्पवयीन मुलींचीही तुरुंगात रवानगी केल्यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांवर टीकेची झोड उठली आहे. 

Web Title: Police custody for 9 persons including 2 minor girls in cow slaughter case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.