उमर खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्यच्या पोलीस कोठडीत वाढ
By admin | Published: February 27, 2016 06:24 PM2016-02-27T18:24:26+5:302016-02-27T18:24:26+5:30
जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेले विद्यार्थी उमर खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्य यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 27 - जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेले विद्यार्थी उमर खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्य यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने 2 दिवस पोलीस कोठडीत वाढ केली आहे. दिल्ली पोलिसांनी 5 दिवसांची पोलीस कोठडी वाढवून मागितली होती मात्र न्यायालयाने फक्त दोनच दिवसांची वाढ करुन दिली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने उमर खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्यला बुधवारी 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
दरम्यान दिल्ली पोलीस आयुक्त बी एस बस्सी यांनी हे प्रकरण स्पेशल सेलकडे सोपवण्यात याव असं सुचवलं आहे. दिल्ली पोलीस कन्हैय्या कुमार आणि इतर आरोपींची चौकशी करत आहे, चौकशी अधिकारी यासंबंधी निर्णय घेतील मी फक्त सचुवलं आहे अशी माहिती बस्सी यांनी दिली आहे. दिल्ली पोलिसांकडे इतरही जबाबदा-या असल्याने फक्त या केसवर लक्ष केंद्रीत करण शक्य होत नाहीये त्यामुळे हे प्रकरण स्पेशल सेलकडे सोपवण्यात यावे असं मत बस्सी यांनी व्यक्त केलं आहे.