सिमी दहशतवादी चकमकप्रकरणी पोलिसांनी आरोप फेटाळले

By admin | Published: October 31, 2016 08:56 PM2016-10-31T20:56:03+5:302016-10-31T21:23:46+5:30

भोपाळमधील तुरुंगातून पळून गेलेल्या सिमीच्या आठ दहशतवाद्यांना पोलिसांनी चकमकीत सोमवारी ठार केले. यानंतर या चकमकीवरून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करत राजकीय वर्तुळात टीका करण्यास सुरुवात झाली.

Police denied the allegations of SIMI firing | सिमी दहशतवादी चकमकप्रकरणी पोलिसांनी आरोप फेटाळले

सिमी दहशतवादी चकमकप्रकरणी पोलिसांनी आरोप फेटाळले

Next
ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. 31 -  भोपाळमधील तुरुंगातून पळून गेलेल्या सिमीच्या आठ दहशतवाद्यांना पोलिसांनी चकमकीत सोमवारी ठार केले. यानंतर या चकमकीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित करत राजकीय वर्तुळात अनेक आरोप करण्यास सुरुवात झाली. 
सिमी दहशतवाद्यांनी गोळीबार केला असता, त्यांच्या प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत त्यांना ठार करण्यात आले. तसेच, त्यांच्याकडून चार गावठी कट्टे आणि तीन धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली, असे सांगत पोलिसांनी याप्रकरणी करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.
ज्यावेळी सिमी दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार केला. त्यावेळी त्यांच्या प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात त्यांना ठार करण्यात आले. दहशवाद्यांनी पोलिसांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात तीन पोलीस जखमी झाले. तसेच, पोलीसांनी आधी हवेत गोळीबार केला. या कारवाईनंतर दहशतवाद्यांकडून चार गावठी कट्टे आणि तीन धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलिस महानिरीक्षक योगेश चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
(सिमी दहशतवादी चकमकीची न्यायालयीन चौकशी करा - असदुद्दीन ओवैसी)
(तुरुंगातून पळालेले सिमीचे आठ दहशतवादी चकमकीत ठार)
 

Web Title: Police denied the allegations of SIMI firing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.