संतापजनक; क्वारंटाईन सेंटरमधून फेकल्या लघवीने भरलेल्या बाटल्या, FIR दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 04:52 PM2020-04-09T16:52:44+5:302020-04-09T17:02:31+5:30

दिल्ली अर्बन शेल्टर इंप्रुव्हमेंट बोर्डाने (डीयूएसआयबी) दिलेल्या माहितीप्रमाणे, द्वारका येथील क्वारंटाईन सेंटरच्या फ्लॅट क्रमांक १०९, ११०, १११ आणि ११२मधून काही लोकांनी पंप हाऊसवर लघवीने भरलेल्या बाटल्या फेकल्या.

Police Filed FIRs against Inmates of Dwarka and Bakkarwala Quarantine Centres for Misbehaviour sna | संतापजनक; क्वारंटाईन सेंटरमधून फेकल्या लघवीने भरलेल्या बाटल्या, FIR दाखल

संतापजनक; क्वारंटाईन सेंटरमधून फेकल्या लघवीने भरलेल्या बाटल्या, FIR दाखल

Next
ठळक मुद्देद्वारका येथील क्वारंटाईन सेंटरच्या फ्लॅट क्रमांक १०९, ११०, १११ आणि ११२मधून फेकण्यात आल्या या बाटल्यासूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, द्वारका येथील क्वारंटाईन सेंटरमधील २०० लोक निजामुद्दीन येथे झालेल्या कार्यक्रमात उपस्थित होतेबक्कडवाला क्वारंटाईन सेंटरमध्ये एका व्यक्ती आरोग्य कर्मचाऱ्याच्या अंगावर थुंकली

नवी दिल्ली : देशातील अनेक कोरोना क्वारंटाईन सेंटर्समध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत असभ्य वर्तन होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. यासंदर्भात तक्रारीही नोंदवल्या गेल्या आहेत. अशीच एक संतापजनक घटना दिल्लीतील द्वारका येथे असलेल्या  एका क्वारंटाईन सेंटरमध्ये घडली आहे. येथील काही क्वारंटाईन व्यक्तींनी चक्क लघवीने भरलेल्या बाटल्याच बाहेर फेकल्या आहेत. तर बक्कडवाला सेंटरमध्ये एक जण आरोग्य कर्मचाऱ्याच्या अंगावर थुंकल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दिल्ली अर्बन शेल्टर इंप्रुव्हमेंट बोर्डाने (डीयूएसआयबी) दिलेल्या माहितीप्रमाणे, द्वारका येथील क्वारंटाईन सेंटरच्या फ्लॅट क्रमांक १०९, ११०, १११ आणि ११२मधून काही लोकांनी पंप हाऊसवर लघवीने भरलेल्या बाटल्या फेकल्या. कारण केवळ याच फ्लॅट्सच्या खिडक्यांमधून तेथे काहीही फेकता येऊ शकते. यासंदर्भात डीयूएसआयबीच्या सिव्हिल डिफेन्सच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर, दिल्ली पोलिसांनी या क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेल्या काही अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेले २०० जण हे मार्च महिन्यात निजामुद्दीन येथे झालेल्या तब्लिगी जमातच्या कार्यक्रमात उपस्थित होते. गुन्हा नोंदवला गेला असला तरी, यासंदर्भात पोलिसांना पुरावा म्हणून कुठल्याही प्रकारचे व्हिडिओ रेकॉर्डिंग अथवा सीसीटीव्ही फुटेज मिळालेले नाही. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. 

बक्कडवाला क्वारंटाईन सेंटरमध्ये थुंकण्याचा प्राकार -

दुसऱ्या एका घटनेत, पंजाबी बागचे उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी मुंडका पोलीस ठाण्यात काही क्वारंटाईन व्यंक्तींवरोधात तक्रार दाखल केली आहे. यात, बक्कडवाला क्वारंटाईनमध्ये एका व्यक्तीने आरोग्य कर्मचाऱ्यासोबत असभ्य वर्तन करत अंगावर थुंकल्याचे म्हटले आहे. मोहम्मद इर्शात, असे या व्यक्तीचे नाव आहे.

यासंदर्भात पोलिसांनी आयपीसीच्या कलम १८८/२६९/२७० आणि २७१, साथीचे रोग कायदा कलम ३ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
 

Web Title: Police Filed FIRs against Inmates of Dwarka and Bakkarwala Quarantine Centres for Misbehaviour sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.