पोलीस हा अखेरपर्यंत पोलीस : सिंघल
By admin | Published: August 30, 2016 11:53 PM2016-08-30T23:53:15+5:302016-08-31T00:25:20+5:30
नाशिक : पोलीस खात्यातील अधिकारी असो वा कर्मचारी तो सेवेतून निवृत्त झाला असला तरी तो अखेरपर्यंत पोलीसच असतो़ सेवानिवृत्तीनंतर कुटुंबीयांसमवेत वेळ घालवितानाच आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा समाजासाठी कसा देता येईल या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी केले़ पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या बैठकीत ते बोलत होते़

सिंघल यांनी सांगितले की, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचार्यांच्या अनुभवाची नेहमीच गरज भासते़ त्यांच्या प्रदीर्घ अनुभव व ज्ञानाचा फायदा त्यांनी पोलीस यंत्रणेतील चुका दाखविण्यासाठी करावयास हवा़ त्यांच्याकडून हा फायदा मिळावा यासाठी लवकरच कार्यशाळांचे आयोजन केले जाईल़ तसेच या संघटनेने सामाजिक प्रश्न, जनजागृती, वाहतूक व्यवस्था, कायदा सुव्यवस्थेसाठी मदत करावी़ या सेवानिवृत्तांच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी सिंघल यांनी दिले़
सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष रावसाहेब पोटे यांनी संघटनेने केलेल्या कामाचा आढावा घेऊन समस्या मांडल्या़ त्यामध्ये निवृत्तीवेतन, मुलांची बेरोजगारी, सेवानिवृत्तीनंतर बंद होणारी विमा पॉलिसी यामुळे जीवन जगणे अस होते़ त्यामुळे शासनाने पैसे घेऊन ही योजना सुरू ठेवावी तसेच मिलिटरीप्रमाणे कॅन्टीन व्यवस्था सुरू करण्याच्या मागणीसाठी संघटना प्रयत्नशील असल्याचे सांगितले़
या बैठकीला संघटनेचे चंद्रकांत बनकर, रमेश पाटील, डॉ. गोगटे, अशोक पाटील, सुभाष थोरात, श्रीकांत जावळे, माजी सहायक आयुक्त गुर्हाळे, आव्हाड आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)