पोलिसांशी हुज्जत घालणे पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2016 10:55 PM2016-06-11T22:55:49+5:302016-06-11T22:55:49+5:30
जळगाव: दुचाकीवर तीन जण व त्यातही मद्याच्या नशेत तर्रर्र असताना वाहतुक पोलिसांशी हुज्जत घालणे तीन तरुणांना चांगलेच महागात पडले. तिघांना पोलिसांनी ताब्यात घेत एकाची कोठडीत रवानगी केली. त्यांच्या समर्थनार्थ आलेल्या एका वकीलानेही पोलीस निरीक्षकांशी वाद घातला.त्यामुळे शनिवारी दिवसभर हा विषय चर्चेचा ठरला.
Next
ज गाव: दुचाकीवर तीन जण व त्यातही मद्याच्या नशेत तर्रर्र असताना वाहतुक पोलिसांशी हुज्जत घालणे तीन तरुणांना चांगलेच महागात पडले. तिघांना पोलिसांनी ताब्यात घेत एकाची कोठडीत रवानगी केली. त्यांच्या समर्थनार्थ आलेल्या एका वकीलानेही पोलीस निरीक्षकांशी वाद घातला.त्यामुळे शनिवारी दिवसभर हा विषय चर्चेचा ठरला.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, वाहतुक शाखेचे चार कर्मचारी शुक्रवारी संध्याकाळी साडे सात वाजता पारीख पार्क उद्यानाजवळ वाहनांची तपासणी करीत असताना एका दुचाकीवर तीन तरुण आले. या कर्मचार्यांनी त्यांना थांबवले. त्यातील एकाने मी ३९२ चा आरोपी आहे, तुम्ही माझे काय करुन घेणार असे म्हणत हुज्जत घातली. यातील दोघं जण मद्याच्या नशेत होते. त्यांच्या ड्रंक ॲण्ड ड्राईव्हची केस करण्यात आली. या वादामुळे तिघांना जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला आणण्यात आले. ३९२ चा आरोपी म्हणणार्याचे रेकॉर्ड तपासले असता खरोखर त्याच्यावर रामानंद नगर पोलीस स्टेशनला ३९२ चा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले.वकील-निरीक्षकात वाद एका राजकीय पक्षाचे काम करणार्या वकीलाने पोलीस स्टेशन गाठून या तरुणांना सोडून द्यावे यासाठी पोलीस निरीक्षक कुबेर चवरे यांना विनंती केली, मात्र त्यांनी त्यास नकार दिला. तुम्ही वकील आहात तर न्यायालयातूनच त्यांना सोडा असे चवरे यांनी सुनावल्याने त्यावरुन दोघांमध्ये शाब्दीक चकमक झाली. त्यानंतर तिघांना न्यायालयात नेण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.दरम्यान, यातील एका तरुणाने पोलीस स्टेशनला येवून माझ्या मुलावर अन्यायकारक कारवाई करण्यात आली, यापूर्वीही त्याच्यावर असाच खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता, असा आरोप त्यांनी केला.