सिमेंटच्या ट्रकमध्ये आढळली 1.90 कोटींची रोकड, पोलिसांकडून रक्कम जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 04:06 PM2019-04-10T16:06:49+5:302019-04-10T16:07:26+5:30
देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांकडून चौकशी करण्यात येत आहे.
विजयवाडा - कृष्णा जिल्ह्यातील विजयवाडा ग्रामीण पोलिसांनी वाहनांची तपासणी करताना एका गाडीतून 1.90 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. सिमेंटची पोती घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये पोलिसांना ही रोकड सापडल्यानं खळबळ उडाली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर ही रक्कम सापडल्यानं कुठल्या पक्षाकडून आचारसंहितेचा भंग तर होत नव्हता ना, याची तपासणी पोलिसांकडून करण्यात येत आहे.
देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांकडून चौकशी करण्यात येत आहे. तसेच संशयित वाहनांची तपासणीही केली जात आहे. आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी निवडणूक आयोग दक्ष आहे. तरीही, निवडणूक काळात पैशाचा गैरवापर आणि आचारसंहिता भंगाच्या घटना उघडकीस येत आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या एक दिवस अगोदर विजयवाडा येथे पोलिसांनी एका सिमेंटने भरलेल्या ट्रकची तपासणी केली. त्यावेळी, 1.90 कोटी रुपयांची रोख रक्कम आढळून आली आहे. पोलिसांनी ही रक्कम जप्त केली असून ड्रायव्हरची चौकशी करण्यात येत आहे. मात्र, मतदानाच्या एक दिवस अगोदर एवढी मोठी रोख रक्कम सापडल्याने राजकीय पुढाऱ्यांकडून मतदान प्रकियेत पैशाचा वापर होत असल्याचं दिसून येत आहे.
Andhra Pradesh: Police has recovered Rs 1.90 Crore in cash from a lorry carrying cement bags, in Vijayawada Rural, Krishna district. The lorry driver has been detained and investigation in the matter is underway. pic.twitter.com/9higzxflDC
— ANI (@ANI) April 10, 2019