BSF जवानाची निर्घृण हत्या; मुलीचा अश्लील व्हिडीओ करणाऱ्यांचा केला होता विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 01:02 PM2022-12-27T13:02:41+5:302022-12-27T13:03:42+5:30
गुजरातमध्ये बीएसएफ जवानाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे.
Gujarat BSF Soldier Lynching । नवी दिल्ली : गुजरातमध्ये बीएसएफ जवानाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे. खरं तर गुजरातमधील नडियाद जिल्ह्यात एका बीएसएफ जवानाने आपल्या मुलीचा अश्लील व्हिडीओ करणाऱ्यांचा विरोध केला असता ही घटना घडली. आरोपी मृत बीएसएफ जवानाच्या मुलीचा अश्लील व्हिडीओ करत होते. नडियादचे डीएसपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेलजीभाई वाघेला आणि त्यांचा मुलगा काही नातेवाईकांसह आरोपी शैलेश जाधवच्या घरी गेले होते. यादरम्यान वाद झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या घरी पोहोचल्यावर दोन्ही गटामध्ये भांडण झाले असता आरोपीचे वडील, काका व इतर कुटुंबीयांनी मृत बीएसएफ जवान वाघेला यांच्यावर हल्ला केला, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
BSF जवानाच्या हत्येप्रकरणी 7 जणांना अटक
डीएसपी व्हीआर बाजपेयी यांनी बीएसएफ जवानाच्या हत्येप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आले असल्याची माहिती दिली. डीएसपी यांनी सांगितले की, 24 डिसेंबर रोजी नडियादमध्ये मुलीची अश्लील व्हिडीओ काढण्याला विरोध केल्यामुळे मुलीचे वडील बीएसएफ जवानाची हत्या करण्यात आली होती. यादरम्यान पीडित जवानाचा मुलगाही जखमी झाला, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. बीएसएफ जवान मेलजीभाई वाघेला यांची हत्या केल्याप्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली.
Gujarat | Seven accused arrested after they killed a BSF soldier Meljibhai Vaghela as he went to their home after one of the accused Shailesh Jadav made a video of victim's daughter viral in Chaklasi village in Nadiad on December 24: DSP VR Bajpai, Nadiad (26.10) pic.twitter.com/k3fEgrvARF
— ANI (@ANI) December 27, 2022
आरोपीने बनवला होता अश्लील व्हिडीओ
एफआयआरनुसार, गुजरात नडियाद तहसीलच्या वानीपुरा गावातील शैलेश उर्फ सुनील जाधव याने बीएसएफ जवान वाघेला यांच्या मुलीचा व्हिडीओ बनवला होता. काही दिवसांपूर्वी आरोपीने हा व्हिडीओ अपलोड केल्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे बीएसएफ जवान वाघेला कुटुंबीयांसह आरोपीच्या घरी पोहोचले होते. लक्षणीय बाब म्हणजे 24 डिसेंबर रोजी शैलेशच्या घरात भांडण झाले तेव्हा बीएसएफ जवानाची मुलगी घटनास्थळी उपस्थित नव्हती. वाघेला यांचा मुलगा नवदीप याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"