MBBSच्या विद्यार्थीनीसोबत प्रेम, शारीरिक संबंध अन् धोका; पोलिसांनी आरोपीला फरफटत नेले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 08:02 PM2023-07-21T20:02:45+5:302023-07-21T20:03:16+5:30

बिहारच्या गया जिल्ह्यातील मुझफ्फरपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

 Police have arrested a doctor who cheated an MBBS student in love in Muzaffarpur in Bihar's Gaya district  | MBBSच्या विद्यार्थीनीसोबत प्रेम, शारीरिक संबंध अन् धोका; पोलिसांनी आरोपीला फरफटत नेले

MBBSच्या विद्यार्थीनीसोबत प्रेम, शारीरिक संबंध अन् धोका; पोलिसांनी आरोपीला फरफटत नेले

googlenewsNext

बिहारच्या गया जिल्ह्यातील मुझफ्फरपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका भावी डॉक्टरची प्रेम प्रकरणात फसवणूक करण्यात आली. पीडितेने माहिती देताच स्थानिक पोलिसांनी डॉक्टरलाअटक केली आहे. खरं तर एका एमबीबीएस विद्यार्थिनीने डॉक्टरवर लग्नाच्या बहाण्याने दोन वर्षांपासून लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. अतुल शेखर असे या आरोपी डॉक्टरचे नाव आहे.

दरम्यान, आरोपी डॉक्टर अतुल शेखर हा गया मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या आधी मुझफ्फरपूर येथील SKMCH मध्ये तैनात होता. तिथे वैद्यकिय शिक्षण घेत असलेल्या पीडितेसोबत त्याची भेट झाली होती. भेटीनंतर दोघांचा संवाद वाढला अन् त्यांनी मैत्री केली. हळू हळू त्यांची जवळीक वाढली.

लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षे अत्याचार
पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर अतुल शेखरने लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षे तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, पीडित मुलीने आरोपी डॉक्टरावर लग्नासाठी दबाव टाकला असता तिला गया येथील एका मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. डॉक्टरने पीडितेशी बोलणे देखील बंद केले होते. यानंतर पीडितेने मुजफ्फरपूरमधील अहियापूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर मुझफ्फरपूर पोलिसांनी पीडित मुलीसह आरोपी डॉक्टर जिथे होता ते हॉस्पिटल गाठले. मात्र, पोलिसांना पाहताच आरोपीने लपण्याचा प्रयत्न केला. आरोपी डॉक्टर हॉस्पिटलच्या केबिनमध्ये घुसला. बराच वेळ वाट पाहूनही आरोपी बाहेर न आल्याने पोलिसांनी केबिनमध्ये जाऊन त्याला बाहेर आणले.

आरोपीला फरफटत नेले
दरम्यान, डॉक्टर हॉस्पिटलमधून बाहेर जाण्यास तयार नव्हता. मग संतापलेल्या पोलिसांनी त्याला फरफटत बाहेर आणले अन् रुग्णालयातून अटक केल्याची माहिती दिली. पोलीस टीमसोबत आलेल्या एसआय बबिता कुमारी यांनी सांगितले की, एमबीबीएसच्या विद्यार्थिनीने डॉ. अतुल शेखर याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. यानंतर मुजफ्फरपूर पोलीस आरोपी डॉक्टरला अटक करण्यासाठी पोहोचले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, आता पुढील कारवाई सुरू आहे.

Web Title:  Police have arrested a doctor who cheated an MBBS student in love in Muzaffarpur in Bihar's Gaya district 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.