नितीन गडकरींना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा कुख्यात गुंड; पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 03:36 PM2023-01-17T15:36:06+5:302023-01-17T15:37:17+5:30

nitin gadkari news: अलीकडेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आल्याची माहिती समोर आली होती. 

police have revealed that the accused who threatened to blow up Nitin Gadkari has various crimes  | नितीन गडकरींना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा कुख्यात गुंड; पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा

नितीन गडकरींना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा कुख्यात गुंड; पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा

Next

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आल्याची माहिती समोर आली  होती. त्यांच्या नागपूरमधील जनसंपर्क कार्यालयात शनिवारी सकाळी धमकीचे तीन फोन आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कार्यालय उडवून देण्याची धमकी देणाऱ्या दोषी कैद्याला कर्नाटक पोलीस न्यायालयात हजर करण्याची तयारी करत असून पुढील तपासासाठी त्याला ताब्यात घेण्याची योजना आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जयेश उर्फ ​​शाकीर उर्फ ​​साहिरने सांगितले की, दक्षिण कन्नड जिल्ह्यात वयाच्या 19 व्या वर्षी आई आणि तिच्या मुलाची हत्या केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आले होते. त्याने कोर्टातून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण त्याला वकिलांनी आणि जनतेने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

दरम्यान, आरोपींने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून 100 कोटी रुपयांची मागणी केली होती. पैसे न दिल्यास नितीन गडकरी यांच्यासह संपूर्ण कार्यालय उडवून देण्याची धमकी त्याने दिली. पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. कारागृहात जॅमर बसवण्यात आला असला तरी तो फक्त 2G जॅमर होता आणि 4G मोबाइल नेटवर्कमध्ये तो प्रभावी नव्हता, असे तपासात समोर आले. हे कैदी राजकारण्यांना धमक्या देणारे फोन करत असल्याचे तपासात समोर आले आहे.  

पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा 
खरं तर या आरोपीने सौम्या आणि तिचा तीन वर्षांचा मुलगा जिष्णू यांची 2 ऑगस्ट 2008 रोजी पुत्तूरजवळील शिराडी येथे हत्या केली होती. न्यायालयाने त्याला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. पुत्तूर येथील स्थानिक न्यायालयाच्या इतिहासातील अशा प्रकारची ही दुसरी घटना होती. हत्या झालेली महिला त्याची नातेवाईक असून त्याने तिचे सोन्याचे दागिने लुटले होते. हत्या केल्यानंतर तो केरळला पळून गेला, मग त्याने नाव बदलून लग्न देखील केले. 2012 मध्ये पत्नीशी भांडण आणि नारळाच्या झाडावर चढून गोंधळ घातल्याप्रकरणी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी सांगितले की, सुनावणीदरम्यान त्याने उडी मारून कोर्टातून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याला वकील आणि जनतेने पकडले होते. पोलिसांनी त्याच्याकडून गडकरींना बॉम्बच्या धमकीसंदर्भात फोन नंबर असलेली एक डायरी जप्त केली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

Web Title: police have revealed that the accused who threatened to blow up Nitin Gadkari has various crimes 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.