सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची घरोघर चौकशी (सिंहस्थ पानासाठी)
By admin | Published: July 12, 2015 11:56 PM2015-07-12T23:56:32+5:302015-07-12T23:56:32+5:30
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यातील पर्वणी कालावधीत येणार्या कोट्यवधी भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून एक विशेष मोहीम राबविली जाते आहे़ या काळातील संभाव्य दहशतवादी हल्ला, घातपात, बॉम्बस्फोट अशा प्रकारच्या घटनांची शक्यता नाकारता येत नाही़ त्यामुळे अशा प्रकारचे कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जाते आहे़ सुरक्षेच्या कारणास्तव कोअर ठिकाणची अर्थात पंचवटी, सरकारवाडा, आडगाव परिसरातील नागरिकांची पोलिसांकडून घरोघर जाऊन चौकशी केली जाते आहे़
Next
न शिक : सिंहस्थ कुंभमेळ्यातील पर्वणी कालावधीत येणार्या कोट्यवधी भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून एक विशेष मोहीम राबविली जाते आहे़ या काळातील संभाव्य दहशतवादी हल्ला, घातपात, बॉम्बस्फोट अशा प्रकारच्या घटनांची शक्यता नाकारता येत नाही़ त्यामुळे अशा प्रकारचे कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जाते आहे़ सुरक्षेच्या कारणास्तव कोअर ठिकाणची अर्थात पंचवटी, सरकारवाडा, आडगाव परिसरातील नागरिकांची पोलिसांकडून घरोघर जाऊन चौकशी केली जाते आहे़ पर्वणीकाळात नाशिक व त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणचे मिळून सुमारे दीड कोटी भाविक येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे़ त्यात या दोन्ही ठिकाणच्या शाही पर्वणीच्या तारखा एकाच दिवशी असल्याने पोलिसांपुढे भाविकांच्या सुरक्षेचे आव्हान आहे़ याबरोबरच भाविकांच्या या लोंढ्यामध्ये येणार्या प्रत्येक नागरिकाची तपासणी करण्याचे नियोजनही पोलिसांकडून सुरू आहे़ मात्र तत्पूर्वी ज्या ठिकाणाहून शाही मिरवणूक, शाहीस्नान होणार आहे अशा ठिकाणची तेथील नागरिकांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे़ पंचवटीतील रामकुंडावर साधू-महंत, तर नव्याने तयार करण्यात आलेल्या घाटांवर भाविकांना स्नानासाठी नेले जाणार आहे़ रामकुंड, शाही मिरवणूक मार्ग तसेच घाटांजवळील रहिवासी क्षेत्रातील नागरिकांची अर्थात कोअर एरियाची पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली आहे़ गंगाघाटावरील वाड्यांची परिस्थिती तेथे राहणार्या नागरिकांची संख्या, त्यांच्याकडे पर्वणीकाळात येणारे नातेवाईक यांची चौकशी पोलिसांकडून केली जाते आहे़ याबरोबरच भाडेकरू असल्यास त्याचे ओळखपत्र तपासून बघितले जाते आहे़सिंहस्थ पर्वणी काळात घातपातासाठी एखादा दहशतवादी येण्याची शक्यता नाकारता येत नाही़ त्यामुळे सुरक्षिततेसाठी पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे़ यामध्ये पोलिसांनी या परिसरातील प्रत्येक घराचा उंबरा पायी घालण्याचे काम केले आहे़ तसेच कोणी संशयित वा पाहुणा आलेल्या असल्यास त्याचीही चौकशी करून त्याचे कागदपत्र तपासले जात आहेत़ पोलिसांच्या या कारवाईमुळे काही नागरिकांना त्रास सहन करावा लागत असला तरी सुरक्षिततेसाठी केल्या जाणार्या या कामासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन पोलीस आयुक्त एस़ जगन्नाथन यांच्याकडून केले जाते आहे़ (प्रतिनिधी)