आयरीश तरूणीची हत्या : सीसीटीव्हीच्या क्लोन प्रतीसाठी गोवा पोलिसांची हैदराबादला धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 02:30 PM2017-10-25T14:30:20+5:302017-10-25T14:31:54+5:30
सात महिन्यांपूर्वी केवळ गोवाच नव्हे तर संपूर्ण युरोप हादरवून सोडलेल्या डॅनियली मॅक्लॉग्लीन या आयरीश युवतीच्या खुनाची सुनावणी सध्या रखडली असून या युवतीबरोबर शेवटच्या क्षणी सीसीटीव्ही फुटेजवर दिसलेल्या विकट भगत
मडगाव - सात महिन्यांपूर्वी केवळ गोवाच नव्हे तर संपूर्ण युरोप हादरवून सोडलेल्या डॅनियली मॅक्लॉग्लीन या आयरीश युवतीच्या खुनाची सुनावणी सध्या रखडली असून या युवतीबरोबर शेवटच्या क्षणी सीसीटीव्ही फुटेजवर दिसलेल्या विकट भगत याच्या त्या क्लिपिंगची क्लोन प्रत ताबडतोब मिळावी यासाठी काणकोण पोलिसांनी हैदराबादच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे धाव घेतली आहे.
ब्रिटीश बॅगपॅकर डॅनियली मॅक्लॉग्लीन या वर्षाच्या मार्च महिन्यात होळीच्या दरम्यान गोव्यात आली होती. उत्तर गोव्यातील हणजुणो येथे ती उतरली होती. मात्र होळीचा सण साजरा करण्यासाठी 13 मार्च रोजी ती दक्षिण गोव्याचा अगदी टोकाचा तालुका असलेल्या काणकोण तालुक्यातील राजबाग येथे आली होती. तिथे तिच्या ओळखीच्या विकट भगत या स्थानिक मित्रकडे तिची गाठ पडली. दुसऱ्या दिवशी राजबागच्या एका निर्जनस्थळी तिचा विवस्त्रवस्थेतील मृतदेह सापडला होता. या खुनामुळे संपूर्ण ब्रिटन ढवळून निघाले होते. गोव्याचीही त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी झाली होती.
या प्रकरणात काणकोण पोलिसांनी संशयित विकट भगत याच्याविरोधात मडगावच्या सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या खून प्रकरणाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलबाला झाल्याने ही सुनावणी जलदगतीने घ्यावी यासाठी अभियोग पक्षातर्फे न्यायालयात मागणीही करण्यात आली होती. मात्र जोर्पयत विकट व मॅक्लॉग्लीन एकत्र असल्याच्या चित्रफितीची क्लोन प्रत मिळत नाही तोर्पयत संशयिताचे वकील अरुण ब्राज डिसा यांनी सांगितल्याने सध्या ही सुनावणी अडकून पडली आहे.
नेमकं प्रकरण काय ?
होळीच्या दरम्यान गोव्यात पर्यटक म्हणून आलेल्या मॅक्लॉग्लीन हिचा 14 मार्च रोजी राजबाग - काणकोण येथे विवस्त्रवस्थेत मृतदेह सापडला होता. तिच्या अंगावरील जखमांवरुन हा खूनाचा प्रकार असल्याचे उघड झाले होते. तिचा खून करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचेही उघड झाले होते. ही खूनाची घटना होण्याच्या काही तासापूर्वी संशयित विकट भगत व डॅनियली यांना एका रेस्टॉरंटजवळ पाहिले होते. या रेस्टॉरंटच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरही त्या दोघांच्या हालचाली चित्रीत झाल्या होत्या. नेमक्या याच चित्रफितीची क्लोन प्रत संशयिताच्या वकिलाने मागितली आहे.
काणकोण पोलिसांशी यासंबंधी संपर्क साधला असता, या प्रकरणात जप्त केलेला सर्व मुद्देमाल रासायनिक तपासणीसाठी हैदराबादला पाठवून दिला आहे त्यात या चित्रफितीचाही समावेश आहे. या चित्रफितीची क्लोन प्रत उपलब्ध करुन द्यावी यासाठी हैदराबादच्या प्रयोगशाळेशी संपर्क साधला असून येत्या आठवडाभरात ती प्रत मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
सात महिन्यापूर्वी घडलेल्या या खूनामुळे संपूर्ण युरोप हादरुन गेला होता. या प्रकरणात केवळ एका विकटचाच हात नसून इतरांचाही त्यात समावेश असावा असा संशय त्यावेळी मृताच्या नातेवाईकांनी व्यक्त केला होता. त्यानंतर विकटनेही आपल्या बहिणीला लिहिलेल्या एका पत्रत या खूनात आपला हात नसून आपल्या मित्रंचा हात असल्याचा दावा केल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले होते. आपल्या मित्रांनी आपल्या डोळ्यासमोर मॅक्लॉग्लीनवर हल्ला करुन तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी मी तिला वाचवायचा प्रयत्न केला होता मात्र माङया खांद्यावर शस्त्रक्रिया झाल्याने त्या दोन मित्रंचा आपण प्रतिकार करु शकलो नाही असे विकटने आपल्या बहिणीला लिहिलेल्या पत्रत लिहल्याने खळबळ माजली होती. विकटने जरी असा दावा केला असला तरी काणकोण पोलीस मात्र या प्रकरणात विकटशिवाय अन्य कुणाचा हात नाही या भूमिकेवर ठाम आहेत.