उमर खालीद आणि अनिर्बनने देशविरोधी घोषणा देण्यास प्रवृत्त केल्याची पोलिसांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2016 12:05 PM2016-03-17T12:05:25+5:302016-03-17T12:07:34+5:30
जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील विद्यार्थी उमर खालीद आणि अनिर्बन भट्टाचार्य यांनीच विद्यार्थ्यांना देशविरोधी घोषणा देण्यासाठी उकसवल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. १७ - जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी उमर खालीद आणि अनिर्बन भट्टाचार्य यांनीच विद्यार्थ्यांना देशविरोधी घोषणा देण्यासाठी उकसवलं असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे. बुधवारी दिल्ली पोलिसांनी न्यायालयात ही माहिती दिली.
उमर खालीद आणि अनिर्बन भट्टाचार्य यांनी केलेल्या जामीन याचिकेवरील सुनावणीदरम्यान हा माहिती देण्यात आली. न्यायालय 18 मार्चला याप्रकरणी आपला निकाल देणार आहे. उमर खालीद आणि अनिर्बन भट्टाचार्य यांनीच 9 फेब्रुवारीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आयोजकांमध्ये कन्हैय्या कुमारचा समावेश नव्हता अशी माहितीदेखील पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी 2 मोबाईल जप्त केले आहेत तसंच कार्यक्रमात वापरण्यात आलेले पोस्टरदेखील पोलिसांनी ईमेवरुन मिळवले आहेत. ज्यावरुन उमर खालीद आणि अनिर्बन भट्टाचार्य यांनी परवानगी नाकारली असतानादेखील कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं हे सिद्ध होत आहे अशी माहिती वकिलांनी न्यायालयात दिली आहे.