पहिली ट्रान्सजेंडर महिला बनणार पोलीस निरीक्षक

By Admin | Published: November 7, 2015 02:02 AM2015-11-07T02:02:36+5:302015-11-07T02:02:36+5:30

लिंग परिवर्तन करून घेतलेल्या के. प्रथिका याशिनी हिला पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती देण्याचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने गुरुवारी तमिळनाडू पोलीस सेवा भरती मंडळाला दिले.

The police inspector will become the first transgender lady | पहिली ट्रान्सजेंडर महिला बनणार पोलीस निरीक्षक

पहिली ट्रान्सजेंडर महिला बनणार पोलीस निरीक्षक

googlenewsNext

चेन्नई : लिंग परिवर्तन करून घेतलेल्या के. प्रथिका याशिनी हिला पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती देण्याचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने गुरुवारी तमिळनाडू पोलीस सेवा भरती मंडळाला दिले. प्रथिका याशिनी ही त्या पदासाठी पात्र असल्याचे खंडपीठाने म्हटले.
मुख्य न्यायमुर्ती संजय किशन कौल आणि न्यायमुर्ती पुष्पा सत्यनारायण यांच्या खंडपीठाने मंडळाने यानंतरच्या भरती प्रक्रियेमध्ये लिंग बदललेल्यांना (ट्रान्सजेंडर) ‘तिसरा वर्ग’ म्हणून समावेश करावा, असेही सांगितले. प्रारंभी याशिनीचा या पदासाठीचा अर्ज फेटाळला गेला होता त्यामुळे तिने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. लिंग परिवर्तन करून घेतलेल्यांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या नागरिकांचा दर्जा देऊन त्यांना सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमधील राखीव जागांचा लाभ द्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका निर्णयाद्वारे केंद्र आणि राज्य सरकारांना दिले होते. या निर्णयाचा आधार के. प्रथिका याशिनी हिने या याचिकेसाठी घेतला होता. उच्च न्यायालयाने अधिकाऱ्यांना सात सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशात प्रथिका याशिनी हिची काही अटींवर तोंडी परीक्षा घेण्यास सांगितले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: The police inspector will become the first transgender lady

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.