पोलिसांनी रोखले अल्पवयीन मुलीचे लग्न निनावी तक्रार : दोघांच्या पालकांना बजावली नोटीस
By admin | Published: January 3, 2016 12:03 AM2016-01-03T00:03:34+5:302016-01-03T00:03:34+5:30
सेंट्रल डेस्क, हॅलो ग्रामीणसाठी
Next
स ंट्रल डेस्क, हॅलो ग्रामीणसाठीजळगाव: एका निनावी तक्रारीच्या आधारे अल्पवयीन मुलीचे रविवारी होणारे लग्न शनी पेठ पोलिसांनी रोखले आहे. शनिवारी होणारा साखरपुडाही थांबविण्यात आला. पांझरापोळमधील एका शाळेत हा विवाह समारंभ होणार होता. जळगाव येथील तरुणाशी भुसावळ येथील अल्पवयीन मुलीचा विवाह निित झाला होता. सर्व नातेवाईकांना पत्रिकांचे वाटप झाले होते. विवाहासाठीची खरेदीही पूर्ण झाली होती. शनिवारी सकाळी साखरपुडा व संध्याकाळी नवरदेव-नवरीला हळद लागणार होती. मात्र एका निनावी पत्रामुळे दोघांकडील मंडळीच्या आनंदावर विरजन पडले. या विवाह समारंभाबाबत जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी यांच्याकडे २३ डिसेंबर रोजी एक निनवी तक्रार अर्ज प्राप्त झाला होता. पांझरापोळमध्ये तीन जानेवारी रोजी हा विवाह होणार असल्याचे त्यात म्हटले होते. त्यानुसार त्यांच्या कार्यालयातून ते पत्र शनी पेठ पोलिसांना पाठविण्यात आले. त्यांना ३० डिसेंबर रोजी ते प्राप्त झाले. तर एक पत्र भुसावळ पोलिसांना देण्यात आले. इफो...पालकांची काढली समजूतपोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान, सहायक निरीक्षक संदीप पाटील व उपनिरीक्षक प्राची राजूरकर यांनी नवरदेव व त्याच्या पालकाला नोटीस देऊन पोलीस स्टेशनला बोलावून घेतले. सामाजिकदृष्ट्या तसेच पालकाच्या नात्याने तुमचा निर्णय योग्य असला तरी कायदा त्याला मान्यता देत नाही. सकारात्मक व नकारात्मक परिणामाची या अधिकार्यांनी नवरदेव व त्याच्या वडिलांना जाणीव करुन दिली. त्यांनीही पोलिसांच्या भूमिकेशी सहमती दर्शवित लग्नाचा निर्णय रद्द केला.साखरपुडा तरी करु द्या... विवाह रद्द झाल्याने साखरपुडा तरी करु द्यावा असा आग्रह मुलाकडील मंडळींनी धरला, परंतु तेही कायद्याच्या विरोधातच असल्याने दोन वर्ष थांबावे, असा सल्ला पोलिसांनी दिला. त्यामुळे आज होणारा साखरपुडा व हळदीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला.तिकडे मुलीकडील मंडळींचीही भुसावळ पोलिसांनी समजूत काढली.